पहिल्या पत्नीला घटस्फोट, दुसऱ्या महिलेसोबत लग्न! आता थेट तिसऱ्या नवरीच्या शोधात... स्वत:च्या मुलीची सुद्धा पर्वा...
उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एका व्यक्तीने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि दुसऱ्या महिलेसोबत लग्न केलं. मात्र, आता ती व्यक्ती तिसरं लग्न करण्याची योजना आखत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बातम्या हायलाइट

पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन दुसऱ्या पत्नीसोबत केलं लग्न

आता तिसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप...
Crime News: उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एका व्यक्तीने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि दुसऱ्या महिलेसोबत लग्न केलं. मात्र, आता ती व्यक्ती तिसरं लग्न करण्याची योजना आखत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीच्या पत्नीने आपल्या पतीच्या विरोधात FIR दाखल केली असल्याची माहिती आहे. पती तिला घटस्फोट देण्यासाठी बळजबरी करत असून तिने घटस्फोट न दिल्यास तिला मारुन टाकण्याची देखील धमकी देत असल्याचा पत्नीने आरोप केला आहे.
सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी छळ...
संबंधित प्रकरण पीजीआय परिसरातील असल्याचं सांगण्यात येत आहे. बुधवारी या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला आहे. फर्रूखाबादच्या फतेहगढची मूळ रहिवासी असलेली शालू सध्या पीजीआयच्या बाबूखेडा परिसरात राहून नोकरी करत असल्याची माहिती आहे. याच परिसरात राहणाऱ्या आशुतोष नावाच्या तरुणासोबत संबंधित महिलेचं लग्न झालं. मात्र, लग्नानंतर सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा छळ करायला सुरुवात केली. तसेच, तिला अनेकदा मारहाण सुद्धा करण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेने केला.
हे ही वाचा: बुरखा शॉप चालवणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गँगरेप! शेजाऱ्याने व्हिडीओ पोस्ट केला, वडिलांनी केली CM पोर्टलवर न्यायाची मागणी!
हुंड्यासाठी दुसऱ्या महिलेसोबत लग्न
दोन्ही कुटुंबियांमध्ये परस्पर चर्चा करुन हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु शालूचा त्रास काही कमी झाला नाही. शालूचा आरोप आहे की तिच्या पतीने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर तिच्याशी लग्न केले होतं. हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्यामुळे तिचा नवरा आता दुसऱ्या महिलेशी संबंध ठेवत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. शालूला आशूतोषपासून एक मुलगी असूनही सासरच्यांकडून तिला वाईट वागणूक मिळत असल्याचं तिने सांगितलं.
हे ही वाचा: मुंबईची खबर: आता मुंबईकरांच्या प्रवासाचा वेळ वाचणार! कोस्टल रोड आणि एससीएलआर एक्सटेंशनचं उद्घाटन...
सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल
शालूच्या मते, केवळ हुंड्यासाठी पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन शालूसोबत लग्न केलं असल्याचं तिच्या पतीने तिला स्वत:हून सांगितलं होतं. त्याला हुंडा मिळाला नाही म्हणून आता तो दुसऱ्या महिलेशी लग्न करण्यास तयार आहे. आशुतोषसोबत मिळून त्या दुसऱ्या महिलेने सुद्धा शालूला मारहाण, शिवीगाळ आणि धमकी दिली. या प्रकरणात पीडितेने बुधवारी तिचा पती आशुतोष, सासू सुशीला, सासरे श्यामवीर, दीर आशिष आणि अभिनव तसेच, नणंद राखी यांच्याविरुद्ध गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपींवर आवश्यक ती कारवाई केली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.