मुंबईची खबर: आता मुंबईकरांच्या प्रवासाचा वेळ वाचणार! कोस्टल रोड आणि एससीएलआर एक्सटेंशनचं उद्घाटन...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोस्टल रोड, एससीएलआर एक्सटेंशन, कला नगर फ्लायओव्हरचं उद्घाटन केलं. हे मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर वाहने त्यांच्या गंतव्यस्थानावर अगदी वेगानं पोहोचू शकतील.

बातम्या हायलाइट

मुंबईतील ट्रॅफिक कमी होणार..

कोस्टल रोड आणि एससीएलआर एक्सटेंशनचं उद्घाटन

मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर अवघ्या 59 मिनिटांत गंतव्य स्थानी...
Mumbai News: मुंबईतील ट्रॅफिकची समस्या कमी करण्याच्या दृष्टीने मोठं पाऊल उचलण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोस्टल रोड, एससीएलआर एक्सटेंशन, कला नगर फ्लायओव्हरचं उद्घाटन केलं. हे मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर वाहने त्यांच्या गंतव्यस्थानावर अगदी वेगानं पोहोचू शकतील. तसेच, या नवीन मार्गाच्या उद्घाटनादरम्यान, मुख्यमंत्र्यांनी वाहनचालकांना वाहतूक नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचा सल्लाही दिला.
संपूर्ण मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
हा संपूर्ण मार्ग सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असून नियमांचं पालन न केल्यास कठोर कारवाई होऊ शकते, असं देखील मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं. याबद्दल फडणवीसांनी माहिती देताना सांगितलं, "सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (एससीएलआर एक्सटेंशन) सुरू झाल्याने ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे दरम्यान एक दुवा निर्माण झाला आहे. त्याच्या बांधकामादरम्यान, आम्हाला 1 किमी लांबीचा कर्व्ह म्हणजेच वक्र पूल बांधण्याचाही अनुभव मिळाला."
हे ही वाचा: Pm Modi Speech : महागाई लवकरच होणार कमी, जीएसटीच्या दराबाबत मोठा निर्णय, 'या' दिवाळीत मोठी भेट मिळणार
कोणत्याही भागात 59 मिनिटांत पोहचवण्याचं लक्ष्य
मुंबईतील 60 टक्के ट्रॅफिक हे वेस्टर्न हायवेवर असल्याचं सांगितलं जातं. याच कारणामुळे या महामार्गावर नेहमी ट्रॅफिक पाहायला मिळतं. महामार्गावरील वाहतून कोंडीची समस्या कमी करण्यासाठी हायवेला समांतर एक नवीन मार्ग तयार केला जात आहे. याअंतर्गत, सी लिंक, कोस्टल रोड आणि नवीन रस्ते बांधले जात आहेत. मेट्रोचं बांधकामही वेगाने सुरू असल्याचं सांगण्यात आहे. तसेच, मेट्रोची सेवा सुरू झालेल्या ठिकाणी वाहतूक कोंडी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. मेट्रोच्या सर्व लाइन्सचं काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना मुंबईच्या कोणत्याही भागात अगदी 59 मिनिटांत पोहचवण्याचं सरकारचं लक्ष्य पूर्ण होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं?
प्रवाशांना वेगाने त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचवण्यासाठी सरकारने 'एमएमआरडीए'ला दरवर्षी 50 किमीचा मार्गांवर मेट्रो सेवा सुरू करण्याचं लक्ष्य दिलं आहे. या वर्षी मेट्रो-9, मेट्रो-2B आणि मेट्रो-4 मार्गांवर सेवा सुरू होणार असल्याची माहिती आहे. लोकल ट्रेनमधून होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासआठी सर्व ट्रेन्स एसी आणि दरवाजा बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंत्र्यांकडून घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की "मुंबईचा विकास खूप आधीच व्हायला हवा होता, पण आता सरकार विकासाची गती मंदावू देणार नाही."
हे ही वाचा: पतीच्या हत्येनंतर थेट तुरुंगात... नंतर नवा बॉयफ्रेंड अन् जेलमधून बाहेर आल्यानंतर सासऱ्यालाच संपवलं...
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यक्रमादरम्यान, 'एमएमआरडीए' आणि 'बीएमसी'ला बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाच्या धर्तीवर घरे बांधण्याचा सल्ला दिला. त्यावेळी पवारांनी सांगितलं, "मुंबईत बांधलेले स्कायवॉक वापराविना पडून आहेत. मुंबईत खाजगी संस्थांनी बरीच चांगली बांधकामे केली आहेत. "