आरारारारा खतरनाक! 'ब्युटी पार्लरवाल्यांना नरकात पाठवा..', महिलेच्या भन्नाट मेकअपचा Viral Video पाहून नेटकरी भडकले!
Woman Shocking Video Viral : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून भन्नाट व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या विषयाचे वेगवेगळे व्हिडीओ समोर येतात.

बातम्या हायलाइट

महिलेच्या मेकअपचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?

व्हिडीओ पाहून नेटकरी प्रचंड संतापले
Woman Shocking Video Viral : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून भन्नाट व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या विषयाचे वेगवेगळे व्हिडीओ समोर येतात. स्टंटबाजी करून जीव धोक्यात टाकल्याचा व्हिडीओ कधी व्हायरल होतो, तर कधी जुगाडाचे व्हायरल व्हिडीओ इंटरनेटवर पाहायला मिळतात. कधी ड्रामा तर कधी अपघातांचे व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होतात. अशाच प्रकारचा एक आगळावेगळा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओची तुफान चर्चा रंगली आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?
आता जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यात एका महिलेचं मेकअप केल्याचं दिसत आहे. मेकअपच्या आधीचा चेहरा आणि त्यानंतरचा चेहरा, दोन्हीही पूर्णपणे वेगळे आहेत. त्यामुळे महिलेचा खरा चेहऱ्या ओळखण्यात सर्वांचाच गोंधळ उडाला आहे. व्हिडीओत पाहू शकता की, महिला सावळ्या रंगाची आहे. पण मेकअपनंतर ती पूर्णपणे बदलते. मेकअप केल्यानंतर असं वाटत नाही की, ती तिच महिला आहे. ज्यानेही मेकअप केलं, त्याने कमालच केली आहे. त्यामुळे हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओला वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.
हे ही वाचा >> Pm Narendra Modi Speech : 'दहशतवाद्यांना पोसणारे दहशतवादीच अन्...' ऑपरेशन सिंदूरबाबत काय म्हणाले पंतप्रधान?
इथे पाहा व्हायरल व्हिडीओ
आता तुम्ही जो व्हिडीओ पाहिला, तो व्हिडीओ @Babaxwale नावाच्या यूजरने एक्सवर शेअर केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, पार्लरवाल्यांनी देवाला तरी घाबरावं..व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला. एका यूजरने म्हटलं, काय होतं आणि काय करून टाकलं यांना..दुसऱ्या यूजरने म्हटलं, ब्युटी पार्लर वाल्यांना मोठं पाप लागेल. तिसऱ्या यूजरने म्हटलं, या मेकअप आर्टिस्टला नर्कात गरम तेलात तळायला पाहिजे. चौथ्या यूजरने म्हटलं, अशा लोकांना कधीच माफ केलं नाही पाहिजे.