श्याम बाबूसाठी 17 वर्षांची गर्लफ्रेंड विष प्यायली..पीडितेचा मृत्यू झाल्यावर नराधमाने पलटी मारली..घटनेमागचं कारण पाहून पोलिसही हादरले!
Shocking Love Story Viral News : उत्तरप्रदेशच्या कौशांबी येथे एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. प्रियकरामुळे एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आल्याने लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

बातम्या हायलाइट

श्याम बाबूच्या मनात आला जीवन संपवण्याचा विचार

कुटुंबियांनी पीडित मुलीला रुग्णालयात नेलं आणि...

कुठे घडली ही धक्कादायक घटना?
Shocking Love Story Viral News : उत्तरप्रदेशच्या कौशांबी येथे एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. प्रियकरामुळे एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आल्याने लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पीडित मुलीचं लग्न दुसरीकडे ठरल्याने तिचा प्रियकर विष घेऊन तिला भेटण्यासाठी गेला होता. त्याने मुलीला सांगितलं की, दोघेही विष पिऊन स्वत:ला संपवून टाकू. पण मुलीनं विष पिल्यानंतर तरुणाने पलटी मारली अन् त्याने विष प्राशन केलं नाही. दरम्यान, पीडित मुलीचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
कुठे घडली ही धक्कादायक घटना?
ही घटना कौशांबीच्या पश्चिम शरीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. येथे राहणारी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचं शेजारच्या श्याम बाबू नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. जेव्हा याबाबत कुटुंबियांना कळलं, तेव्हा दोघांनाही भेटण्यास बंदी घालण्यात आली. त्यानंतरही दोघांनी ऐकलं नाही. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी तिचं लग्न ठरवलं. मागच्या बुधवारी पीडित मुलीचा साखरपूडा होणार होता. याबाबत श्याम बाबूला कळलं, तेव्हा त्याचं टेन्शन वाढलं.
हे ही वाचा >> Pm Narendra Modi Speech : 'दहशतवाद्यांना पोसणारे दहशतवादीच अन्...' ऑपरेशन सिंदूरबाबत काय म्हणाले पंतप्रधान?
श्याम बाबूच्या मनात आला जीवन संपवण्याचा विचार
श्याम बाबू अस्वस्थ झाल्यानंतर त्याने पीडितेला सांगितलं की, दोघेही विष पिऊन आत्महत्या करू. प्रियकराने सांगितल्यानंतर पीडित मुलीनं विष प्राशन केलं. पण स्वत: श्याम बाबूने विष प्यायलं नाही. आरोपी मुलीला तशाच अवस्थेत सोडून पळून गेला.
कुटुंबियांनी पीडित मुलीला रुग्णालयात नेलं आणि...
विष प्यायल्यानंतर पीडित मुलीची तब्येत बिघडली अन् कुटुंबियांना धक्काच बसला. त्यानंतर कुटुंबियांनी पीडित मुलीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पीडितेची प्रकृती गंभीर असल्याने तिला प्रयागराजच्या एसआरएन रग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. पण रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. मृत मुलीच्या आई्च्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरण कौशांबीचे डीएसपी जेपी पांडे यांनी म्हटलं की, या प्रकरणी प्रियकराला अटक केली असून त्याची चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.