बाथरूममध्ये गेली की सूनेकडे टक लावून... एके दिवशी मागून आला अन्... सासऱ्याचं घृणास्पद कृत्य उघडकीस

प्रकरणातील पीडिता एके दिवशी बाथरूममध्ये एकटी असताना तिचा सासरा मागून आला आणि सून एकटी असल्याचा फायदा घेऊन त्याने मागून तिला पकडलं. संबंधित आरोपीने त्याच्या सूनेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

बाथरूममध्ये गेली की सूनेकडे टक लावून... एके दिवशी मागून आला अन्...
बाथरूममध्ये गेली की सूनेकडे टक लावून... एके दिवशी मागून आला अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सासऱ्याने केला सूनेवर बलात्काराचा प्रयत्न

point

सासऱ्याचं घृणास्पद कृत्य उघडकीस

Crime News: राजस्थानच्या रामगंजमडी शहरात नातेसंबंधांना काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. प्रकरणातील पीडिता एके दिवशी बाथरूममध्ये एकटी असताना तिचा सासरा मागून आला आणि सून एकटी असल्याचा फायदा घेऊन त्याने मागून तिला पकडलं. संबंधित आरोपीने त्याच्या सूनेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महिलेने थेट तिच्या पतीला फोन करून तिच्या सासऱ्याच्या घाणेरड्या कृत्याबद्दल सांगितलं. नंतर, सुनेने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तिच्या सासऱ्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पीडिता सासू-सासऱ्यांसोबत राहायची

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरणातील आरोपी एक रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहे. 22 वर्षीय पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती जयपूरमध्ये राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. पीडिता तिच्या सासरी सासू-सासऱ्यांसोबत राहते. महिलेची सासू ही ती खैराबाद समितीची प्रमुख असल्याने ती बऱ्याचदा कामानिमित्त बाहेर असते. तसेच, तिचे 55 वर्षीय सासरे सैन्यातून निवृत्त असून ते सध्या घरीच असल्याचं तिने सांगितलं. 

हे ही वाचा: अर्जुन तेंडुलकरने बालपणीच्या मैत्रिणीसोबतच उरकला साखरपुडा... सानिया चंडोक नेमकी आहे तरी कोण?

पीडितेनं पोलिकांकडे केली तक्रार 

पीडितेने पोलिसांकडे तक्रार करताना सांगितलं, "मला माझ्या सासऱ्यांच्या घाणेरड्या कृत्यांमुळे अतिशय वैतागले आहे. मी जेव्हा बाथरूममध्ये जायचे ते आत डोकावून माझ्यावर नजर ठेवायचे. सुरुवातीला मी त्यांच्या अशा कृत्यांकडे दुर्लक्ष केलं. पण दिवसेंदिवस त्यांची माझ्यावरील नजर अधिक वाईट होत चालली होती. एके दिवशी तर, मी एकटी असल्याचा फायदा घेऊन त्यांनी माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मी कसं बसं त्यांच्या तावडीतून सुटले आणि तिथून पळून गेले."

हे ही वाचा: ऐकावं ते नवलंच! एका रात्रीत पळून गेल्या तीन मैत्रिणी... एक बनली नवरी, दुसरी नवरा तर तिसरी दीर... नेमकी घटना काय?

कुटुंबियांनी केलं धरणे आंदोलन

पीडित सुनेनं पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तिच्या सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, तक्रार दाखल करूनही आरोपीला अटक करण्यात पोलिसांकडून विलंब होत असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. घटनेनंतर पीडिता तिच्या माहेरी गेली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवड्यात कुटुंबियांनी 'एसडीएम'कडे एक निवेदन सादर करून आरोपीच्या अटकेची मागणी केली होती. आरोपीच्या अटकेत होणाऱ्या विलंबामुळे संतप्त झालेल्या पीडितेने आणि तिच्या कुटुंबियांनी मंगळवारी एसडीएम कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई केली जात असल्याचं सांगितलं जात आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp