ऐकावं ते नवलंच! एका रात्रीत पळून गेल्या तीन मैत्रिणी... एक बनली नवरी, दुसरी नवरा तर तिसरी दीर... नेमकी घटना काय?

बिहारच्या नवादामध्ये तीन मैत्रिणी अचानक एकत्र घरातून पळून जाऊन गुजरातच्या सूरतमध्ये पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. तीन मैत्रिणींपैकी एक नवरी, दुसरा नवरा तर तिसरी तरुणी दीर बनल्याची धक्कादायर बाब समोर आली आहे.

एक बनली नवरी, दुसरी नवरा तर तिसरी दीर... नेमकी घटना काय?
एक बनली नवरी, दुसरी नवरा तर तिसरी दीर... नेमकी घटना काय?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दोघींनी पळून जाऊन केलं एकमेकींसोबत लग्न

point

एक नवरी, दुसरा नवरी तर तिसरी बनली दीर...

Viral Story: बिहारच्या नवादामध्ये तीन मैत्रिणी अचानक एकत्र घरातून पळून जाऊन गुजरातच्या सूरतमध्ये पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. तिथे जाऊन दोन्ही मैत्रिणींना एकमेकींसोबत लग्न केलं. तीन मैत्रिणींपैकी एक नवरी, दुसरा नवरा तर तिसरी तरुणी दीर बनल्याची धक्कादायर बाब समोर आली आहे. लग्नानंतर तिघी एकत्र राहू लागल्या. तसेच, या तरुणींच्या घरच्यांनी त्या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर तिघांचंही लोकेशन सुरतमध्ये असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी तिन्ही मुलींना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. 

तिन्ही मुली अचानक गायब... 

संपूर्ण गावात या घटनेची चर्चा रंगत असल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित घटना अकबरपुर प्रखंड परिसरात घडल्याची माहिती आहे. मंगळवारी, नेमदारगंज पोलीस आणि सूरत पोलिसांनी तिघींना ताब्यात घेतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. संबंधित तरुणी अल्पयीन असून त्या एकाच शाळेत शिकत असल्याची माहिती समोर आली आहे. तिन्ही मुली शाळेतून मार्कशीट आणण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडल्या. यापैकी दोन मुली एकाच गावात राहणाऱ्या असून तिसरी मुलगी दुसऱ्या गावाची रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. तिघींनी मिळून एकत्र राहण्याची योजना आखली. 

हे ही वाचा: सचिन तेंडुलकर सासरा होणार, सूनबाईंची चर्चा तर... ‘या’ तरुणीने काढली अर्जुनची विकेट!

सूरतमध्ये असल्याची माहिती मिळाली

तिन्ही मुली अचानक गायब झाल्यानंतर नातेवाईकांनी जवळपास दोन दिवस त्यांचा शोध घेतला. मात्र, काहीच सुगावा हाती लागला नाही.अखेर 21 जुलै रोजी नेमदारगंज पोलीस ठाण्यात बेपत्ता तरुणींची तक्रार दाखल करण्यात आली. तपासादरम्यान, तिन्ही मुली सुरतमधील पटेल नगर येथील एका कापड गिरणीत काम करत असल्याचं पोलिसांनी आढळलं. आश्चर्याची बाब म्हणजे, यातील दोन तरुणींनी एकमेकींसोबत लग्न केलं होतं. तसेच, तिसरी मुलगी दीर बनून त्यांसोबत राहत होती. 

पोलिसांची कारवाई 

सुरत आणि नेमदारगंज पोलिसांनी संयुक्त कारवाई केल्यानंतर, तिन्ही मुलींचा शोध घेण्यात आला आणि त्यांनी ताब्यात घेऊन नवादा येथे आणण्यात आलं. तिघांनाही पोलीस ठाण्यात आणलं असता एका मुलीच्या भांगेत सिंदूर आणि दुसऱ्या मुलीला पतीच्या भूमिकेत पाहून सर्वांनाच धक्का बसला. तसेच, तिसरी मुलगी दीर बनल्याने हे प्रकरण चर्चेचा विषय ठरत आहे.

हे ही वाचा: ऑगस्टमध्ये शनि-शुक्र केंद्र योग, शनिची हालचाल आणि काही राशीतील लोकांच्या आयुष्याला कलाटणी

नेमदारगंज पोलीस स्टेशनचे प्रभारी विनय कुमार यांच्या मते, हे एक असामान्य प्रकरण असून पोलीस सर्व बाबी विचारात घेऊन सखोल तपास करत आहेत. मुलींचे जबाब नोंदवल्यानंतरच या प्रकरणात योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. 

हे वाचलं का?

    follow whatsapp