पुणे हादरलं! तरुणाने महिलेशी ठेवले अनैंतिक संबंध, लेकाच्या तळपायाची आग मस्तकात, भररस्त्याच कोयत्याने सपासप वार, नेमकं काय घडलं?

pune crime : पुण्यात वाढत्या गुन्हेगारीने तोंड वर काढलं आहे. ग्रामीण पुण्यातील दौंड तालुक्यातून एक खळबळनजक घटना उघडकीस आली आहे. दौंडमध्ये एका तरुणाने आपल्याच आईशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून एकाचा खून केला आहे.

pune crime
pune crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात गुन्हेगारीत वाढ

point

दौंड तालुक्यातून खळबळनजक घटना

point

तरुणाने अनैंतिक संबंधातून दुसऱ्या तरुणाचा केला खून

point

नेमकं काय घडलं?

pune crime : पुण्यात वाढत्या गुन्हेगारीने तोंड वर काढलं आहे. ग्रामीण पुण्यातील दौंड तालुक्यातून एक खळबळनजक घटना उघडकीस आली आहे. दौंडमध्ये एका तरुणाने आपल्याच आईशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून एकाचा खून केला आहे. यामुळे दौंडमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आरोपीचे नाव विशाल उर्फ नण्या किसन थोरात असे आहे. तसेच या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव प्रवीण दत्तात्रेय पवार असे आहे.

हे ही वाचा : Pm Narendra Modi Speech : 'दहशतवाद्यांना पोसणारे दहशतवादीच अन्...' ऑपरेशन सिंदूरबाबत काय म्हणाले पंतप्रधान?

नेमकं काय घडलं?

पुण्यातील दौंडमधील इंदिरानगर परिसरात गुरूवारी 14 ऑगस्ट रोजी माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादातून हा वाद उफळला. याच वादातून एकाने कोयत्याने प्रवीण दत्तात्रेय पवार यांच्यावर सपासप वार केले आणि त्यात त्याचा जागीच खून झाला.

प्रवीणच्या तोंडावर आणि हातावर कोयत्याने सपासप वार

आपल्या आईसोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून आरोपी विशाल उर्फ नण्या किसन थोरातने असे पाऊल उचलले. प्रवीण पवार आणि त्याच्या आईचे एकमेकांशी अनैतिक संबंध असल्याने विशाल थोरातने प्रवीणच्या तोंडावर आणि हातावर कोयत्याने सपासप वार करत संताप व्यक्त केला. यातच प्रवीणचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा : Pm Modi Speech : महागाई लवकरच होणार कमी, जीएसटीच्या दराबाबत मोठा निर्णय, 'या' दिवाळीत मोठी भेट मिळणार

दरम्यान, घटनेची तक्रार ही नितीन अशोक गुप्ते नावाच्या एका भाजी विक्रेत्याने दौंड पोलीस ठाण्यात केली. संबंधित प्रकरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला भारतीय न्याय संहिता कलम 103 अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. दौंड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास हा पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम यांच्या मार्गदर्शनावरून सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp