Pathaan : 32 वर्षांनंतर थिएटर्स हाऊसफुल्ल; हृतिक रोशनकडूनही SRK चं कौतुक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Pathaan : Theatres houseful after 32 years

ADVERTISEMENT

मुंबई : बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित पण प्रचंड वादग्रस्त ठरलेला चित्रपट ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचत आहे. पठाणने या वर्षाची सुरुवातच धमाकेदार करत, बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशी जवळपास 70 कोटींची कमाई केली. तर अवघ्या दोन दिवसात केवळ भारतात 100 कोटींचा आकडा पार केला आहे. ‘पठाण’ने पहिल्या दिवशी 55 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. (Pathan films crossed the 100 crore collection. on the first day 55 core and 70 core core on the second day.)

पठाण आणि शाहरुख खानची इतकी क्रेझ पाहायला मिळत आहे की, जम्मू आणि कश्मीरमधील चित्रपट गृह तब्बल 32 वर्षांनंतर हाऊसफुल्ल झाली आहेत. कश्मीरमध्ये यापूर्वी कधीही एखाद्या चित्रपटासाठी एवढी गर्दी पाहालया मिळाली नसल्याचं फॅन्स ट्विटरवर सांगतं आहेत. शाहरुखला कश्मीरच्या लोकांचं मिळणार प्रेम पाहुन आयनॉक्सनेही त्यांच्या ट्विटर हॅन्डेलवरुन एक प्रतिक्रिया शेअर केली आहे.

हे वाचलं का?

Pathaan ने बॉलिवूडवर लागलेला कलंक हटवला! सलग दुसऱ्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई…

काश्मीरमधील थिएटर्सच्या बाहेर हाऊसफुल बोर्ड दाखवत आयनॉक्सने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आज पठाण देशाला बांधून ठेवत आहेत. आम्ही किंग खानचे आभारी आहोत, कारण 32 वर्षांनंतर काश्मीर खोऱ्यात चित्रपटगृहांच्या बाहेर हाऊसफुल्लचे फलक लावले जात आहेत. धन्यवाद शाहरुख खान! असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबतच थिएटर मालकाने दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसह YRF कंपनीलाही टॅग केले आहे.

ADVERTISEMENT


Pathaan : दीपिकाचं बेशरम रंग गाणं लागताच कपडे फाटूस्तर हाणामारी

ADVERTISEMENT

दरम्यान, शाहरुखच्या पठाणचे अभिनेता हृतिक रोशननेही तोंड भरुन कौतुक केलं.

What a trip. Incredible vision , some never seen before visuals, tight screenplay, amazing music, surprises and twists all the way thru. Sid you have done it again, Adi your courage astounds me. Congrats Shahrukh, Deepika, John n the entire team.

अशा शब्दात हृतिक रोशनने पठाणचे आणि शाहरुखचं गुनगाण केलं. पण यावेळी चाहत्यांनी हृतिकला ‘वॉर-2’ कधी येणार असाही प्रश्न विचारला आहे. काही चाहत्यांच्या मते त्यांना हृतिकचे ‘वॉर’ मधील पात्र कबीर ‘पठाण’मध्ये पाहण्याची अपेक्षा होती. तर एका चाहत्याने सलमान खानचा ‘टायगर’, शाहरुखचे ‘पठाण’ आणि हृतिकच ‘कबीर’ हे तिन्ही पात्र एकत्र पाहणार असल्याचं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT