शहाजी पाटलांनी थेट उद्धव ठाकरेंनाच केलं लक्ष्य; म्हणाले, ‘हे तोंडी शोभून दिसत नाही’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईतल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्षाविरोधात बंडखोरी करून मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंसह चाळीस आमदारांवर टीकेची तोफ डागली होती. याच मेळाव्यात ठाकरेंनी बाप चोरणारी टोळी महाराष्ट्रात फिरतेय म्हणत शिंदे गटाला डिवचलं होतं. याच विधानावरून शहाजी बापू पाटलांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय.

ADVERTISEMENT

कल्याणमध्ये माध्यमांशी बोलताना शहाजी बापू पाटलांनी उद्धव ठाकरेंबरोबरच अरविंद सावंत, विनायक राऊत आणि संजय राऊत यांच्यावरही टीका केली. शहाजी बापू पाटील म्हणाले, “आम्ही शिवसेनेतून गेलोच नाही. शिवसेनाच आमची आहे. जे मागे राहिलेत त्यांनी असा विचार करावा. जे तुटपुंज गबाळ राहिलं ते ते घेऊन मागे राहायचं की आमच्यासोबत मिसळायचं हा यांच्या मनाचा मोठेपणाचा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी ही खरी शिवसेना आहे”, असं शहाजी बापू पाटील म्हणाले.

“सर्व जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख आणि तळागाळातला शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्याकडे यायला लागला आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातली जनता ही शिंदे यांच्या मागे खंबीरपणे उभी आहे. फडणवीस यांच्या पाठीशी उभी आहे”, असंही शहाजी पाटील यांनी म्हटलंय.

हे वाचलं का?

शिंदेंनी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्री आणि गृह खातं मागितलं होतं : सामनात खळबळजनक दावा

शहाजी बापू पाटील : ठाकरेंसह अरविंत सावंत, विनायक राऊत, संजय राऊतांवर टीका

‘बीके हुए क्या निष्ठा दिखायेंगे’, असं म्हणत शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला होता. त्यावर शहाजी पाटील म्हटलंय की, ‘मुळात अरविंद सावतांसारख्या, विनायक रावतांसारख्या, संजय राऊतांसारख्यांनी वाटोळं केलं. दुसरं वाक्य तुम्ही बोलता ‘बाप चोरला’ हे वक्तव्य मुख्यमंत्री पद भूषवलेल्या एका मोठ्या माणसाच्या तोंडी शोभून दिसत नाही”, असं म्हणत शहाजी पाटलांनी थेट ठाकरेंना लक्ष्य केलं.

ADVERTISEMENT

“हे जे घडलं आहे (शिवसेनेतली बंडखोरी) त्यामुळे जग हदरलं आहे. अख्खा महाराष्ट्र हादरला. तुम्ही इथे सगळ्यांनी विचार करा, आपल्या मनाला विचारा एवढ्या वेगाने आणि एवढा झटक्याने सत्तांतर घडेल असं कुणाला वाटलं होतं का? त्यामुळे हादरलेल्या माणसांना आमच्यावर काय बोलायचं, हे त्यांना सूचेना झालंय, मग उसनं अवसान आणून खोके घेतले, असं काहीतरी काढायचं आणि लहान मुलांसारखं बोलत बसायचं”, अशी टीका शहाजी पाटलांनी ५० खोके एकदम ओकेवरून ठाकरेंवर केलीये.

शिंदे गटात जा, अन्यथा एन्काऊंटर करु : शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला पोलिसांकडून धमकी?

ADVERTISEMENT

“या सगळ्यांना जर कुठे चांगली शाळा असेल तर पहिलीच्या वर्गात त्यांची सगळ्यांची ऍडमिशन घ्यावी लागेल, अशी विचित्र माणसं आहेत. काही यांना अनुभव नाही”, असा टोलाही शहाजी पाटलांनी अरविंद सावंत, विनायक राऊतांना लगावला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT