‘मर्यादा ओलांडू नका’; दसरा मेळाव्याआधी शरद पवारांचा एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरेंना सल्ला
बंडखोरीनंतर होत असलेल्या पहिल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचे प्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार, याचीच सध्या चर्चा होतेय. दसरा मेळाव्यानंतर दोन्ही गटातला राजकीय संघर्ष आणखी विकोपाला जाऊ शकतो, अशीही कुजबूज सुरू झालीये. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दोन्ही नेत्यांना म्हणजेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना सल्ला दिलाय. […]
ADVERTISEMENT
बंडखोरीनंतर होत असलेल्या पहिल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचे प्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार, याचीच सध्या चर्चा होतेय. दसरा मेळाव्यानंतर दोन्ही गटातला राजकीय संघर्ष आणखी विकोपाला जाऊ शकतो, अशीही कुजबूज सुरू झालीये. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दोन्ही नेत्यांना म्हणजेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना सल्ला दिलाय. विशेषतः हा सल्ला देताना शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना ते मुख्यमंत्री असल्याची आठवण करून दिलीये.
ADVERTISEMENT
शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केलाय. शिंदे गटाने शिवसेनेच्या पारंपरिक गोष्टी करण्यास सुरूवात केलीये. यातच शिंदे गटाने दसरा मेळावाही आयोजित केलाय. त्यामुळे यंदा विजयादशमीच्या दिवशी मुंबईत दोन दसरे मेळावे होणार आहेत.
शिवाजी पार्कवर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं भाषण होणार आहे. बीकेसी मैदानावर होणाऱ्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचं भाषण होणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीकेच्या तोफा झडणार हे निश्चित! त्यामुळेच कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न चर्चिला जातोय. याच मुद्द्यावर शरद पवारांनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना सल्ला दिलाय.
हे वाचलं का?
अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर : शिवसेनेतील बंडानंतर शिंदे-ठाकरेंची पहिली परीक्षा
शिवसेना दसरा मेळावा २०२२ : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी काय दिलाय सल्ला?
शिवाजी पार्क आणि बीकेसी मैदानावर होत असलेल्या दसरा मेळाव्यांबद्दल शरद पवार म्हणाले, “दुर्दैव आहे की, एका पक्षाचे दोन भाग झालेत आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झालीये. ती स्पर्धा सुरू झाल्यानंतर त्या स्पर्धेचं सुत्रं दसरा मेळाव्याच्या माध्यमातून स्वीकारलं गेलं. गंमत अशी आहे की या गोष्टी होत राहतात. असं काही नवीन नाही. संघर्ष होतो, पण त्याला एक मर्यादा ठेवली पाहिजे. ती मर्यादा ओलांडून काही होत असेल, तर ते राज्याच्या दृष्टीने चांगलं नाही.”
ADVERTISEMENT
बाळासाहेबांच्या आत्म्याला समाधान नसेल, उद्धव साहेबांनी आत्मपरीक्षण करावं : कदमांचा सल्ला
ADVERTISEMENT
“राज्याच्या जबाबदार लोकांनी हे वातावरण दुरुस्त करण्यासाठी पावलं उचलली पाहिजे. ती पावलं टाकण्याची जबाबदारी आमच्यासारख्या वरिष्ठ लोकांप्रमाणेच, राज्याचे जे प्रमुख आहेत (एकनाथ शिंदे). ते पक्षाचे प्रमुख असतील, पण ते (एकनाथ शिंदे) राज्याचे प्रमुख आहेत. महाराष्ट्रातल्या १४ कोटी लोकांचे ते (एकनाथ शिंदे) प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्यावर (एकनाथ शिंदे) ही जबाबदारी अधिक आहे. त्यामुळे त्यांच्याकडून (एकनाथ शिंदे) अशी अपेक्षा करूया की ते जी मांडणी मांडतील त्यातून कटुता न वाढेल अशा प्रकारची मांडणी दोन्ही बाजूंनी (उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे) केली, तर राज्यातलं वातावरण सुधारायला मदत होईल”, असं शरद पवार म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT