शरद पवार पुन्हा ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल, सोमवारी होणार शस्त्रक्रिया

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या पित्ताशयावर उद्या शस्त्रक्रिया केली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. याधी त्यांच्या पित्ताशयात जे स्टोन झाले होते त्यावर एंडोस्कोपी करण्यात आली. आता त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

या आधी 28 मार्चच्या संध्याकाळी शरद पवारांना पोटदुखीचा प्रचंड त्रास होऊ लागल्याने त्यांना ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 31 मार्चला त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मंगळवारी म्हणजेच 30 मार्चलाच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यांच्या पित्ताशयात असलेले खडे काढण्यात आले.

आता सोमवारी म्हणजेच 12 एप्रिलला शरद पवारांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

शरद पवारांना या आधी काय झालं होतं?

शरद पवार यांच्या पिताशयाच्या पिशवीत आणि नलिकेत दोन्हीकडे स्टोन होते. पित्ताशयाच्या पिशवीत स्टोनचं प्रमाण जास्त होतं, तसंच पित्ताशयाच्या नलिकेत एक स्टोन होता. मंगळवारी त्यांना होणाऱ्या वेदना वाढल्या.. शरद पवार यांना पोटदुखी आणि पाठदुखी असे दोन्ही त्रास जाणवू लागले. त्यामुळे आम्ही आणखी काही चाचण्या केल्या. त्या चाचण्यांना MRCP टेस्ट असं म्हणतात.

ADVERTISEMENT

या टेस्टमुळे पित्ताशय, जठर यांचं कार्य.. त्यांच्या नलिकांचं कार्य हे व्यवस्थित सुरू आहे की नाही याची स्पष्ट कल्पना येते. ही चाचणी केल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की पित्ताशयाच्या नलिकेत असलेला स्टोन हा त्या नलिकेच्या तोंडाशी आला आहे. त्यामुळे आम्हाला शरद पवारांवर मंगळवारी रात्रीच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर अमित मायदेव यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

डॉक्टरांनी सांगितलेली MRCP टेस्ट काय असते त्यामुळे काय समजतं?

MRCP टेस्ट ही अशी चाचणी आहे ज्यामुळे पोटातील स्वादुपिंड, जठर, पित्ताशय यांचं कार्य योग्य पद्धतीने सुरू आहे ना? याचा अत्यंत स्पष्ट अंदाज येतो. पित्ताशयाला सूज आली असेल किंवा त्यामध्ये स्टोन असतील तर त्याची माहिती या टेस्टद्वारे मिळते. पोटामध्ये ट्युमर असेल तर त्याचा आकार किती, त्याची जागा कुठे आहे? हेदेखील या टेस्टमुळे समजतं. स्वादुपिंड, जठर, पित्ताशय या भागांना जर कोणत्या विषाणूंचा प्रादुर्भाव झाला असेल तर तेही या टेस्टमुळे लक्षात येतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT