मोठी बातमी: …आता अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, पवारांकडून क्लीन चीट
नवी दिल्ली: ‘सचिन वाझे यांची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी भेट झाली असं जे परमबीर सिंग सांगत होते त्या काळात देशमुख हे तर कोरोनामुळे रुग्णालयात होते. त्यामुळे परमबीर सिंग यांच्या आरोपात तथ्य नाही. त्यामुळे आता अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. त्यामुळे आता हे स्पष्ट झालं […]
ADVERTISEMENT
नवी दिल्ली: ‘सचिन वाझे यांची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी भेट झाली असं जे परमबीर सिंग सांगत होते त्या काळात देशमुख हे तर कोरोनामुळे रुग्णालयात होते. त्यामुळे परमबीर सिंग यांच्या आरोपात तथ्य नाही. त्यामुळे आता अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. त्यामुळे आता हे स्पष्ट झालं आहे की, परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. त्यामुळे आता देशमुखांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
ADVERTISEMENT
शरद पवार यांनी आज (22 मार्च) पुन्हा एकदा राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आणि परमबीर सिंग यांच्या पत्राविषयी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करत अनिल देशमुख यांची एकप्रकारे पाठराखणच केली आहे.
This has been brought to my notice that Maharashtra HM Shri @AnilDeshmukhNCP who was detected #covid positive in February got discharged from hospital on 15th February and advised to be home quarantine between 15th to 27th February. During this period, he was house quarantined.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 22, 2021
‘परमबीर सिंग यांच्या आरोपात तथ्य नाही’
हे वाचलं का?
‘कोरोनाच्या लागण झाल्यामुळे अनिल देशमुख हे नागपूरमधील एका रुग्णालयात 5 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान दाखल होते. त्यानंतर ते होम क्वारंटाईन होते. त्यामुळे अनिल देशमुख कुठे होते हे स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांच्या आरोपात तथ्य नाही. अनिल देशमुख यांची चौकशी करण्यात यावी की नाही याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील हा त्यांचा अधिकार आहे. हे मी काल देखील म्हटलं होतं.’ असं म्हणत पवारांनी परमबीर सिंग यांच्या दाव्यात काहीही तथ्य नसल्याचं अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.
याचवेळी शरद पवारांनी विरोधकांवर गंभीर आरोप देखील केले आहेत. ‘परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर निर्माण झालेला वाद हा राज्य सरकार अस्थिर करण्याचा कट आहे.’ असंही पवार यावेळी म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
पाहा शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:
ADVERTISEMENT
-
अनिल देशमुखांच्या चौकशीचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा आहे. हे मी काल देखील म्हटलं होतं.
मी एवढं म्हटलं की, ते त्यावेळी हॉस्पिटलमध्ये होते
आमच्याकडे जी माहिती समोर आली त्यावरुन स्पष्ट होत आहे की, मूळ मुद्दा भरकवटला जात आहे.
कुणीही क्लीन चीट देण्याची घाई केलेली नाही
हे सगळं प्रकरण एटीएस तपासत आहे. त्यामुळे हे ज्यांना आवडत असेल त्यांनी हे
डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला आहे का? असा संशय निर्माण होतो आहे.
आपण लोकांनी दाखवलं आहे की, जीपमधून कोण उतरतं, कोण बसतं… हे सगळं आपण दाखवलं आहे. माझ्याकडे कोणतीही माहिती नाही.
महत्त्वाचा मुद्दा दुसरा आहे हा नाहीच… अंबानीच्या घरासमोर गाडी कोणी ठेवली. यामध्ये कोण सहभागी होते, कोणाचा हा कट आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या महत्त्वाच्या मुद्द्यात काही अशी नावं समोर येत आहेत की, ज्यांची सखोल चौकशी होण्याची गरज आहे.
परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर होते. त्यामुळे मी
अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार नसल्याचं शरद पवारांकडून स्पष्ट
परमबीर सिंग यांनी उल्लेख केलेल्या तारखांना अनिल देशमुख कोरोनामुळे रूग्णालयात होते, आरोपच बिनबुडाचे त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच नाही
आता अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही
त्यामुळे परमबीरांच्या आरोपात तथ्य नाही
वाझे यांची गृहमंत्र्यांशी भेट झाली असं जे परमबीर सिंग सांगत होते त्या काळात देशमुख हे तर कोरोनामुळे रुग्णालयात होते.
वाझे-देशमुख भेटीची माहिती चुकीची आहे.
15 ते 27 फेब्रुवारी हे होम क्वॉरंटाइन होते
15 फेब्रुवारीला डॉक्टरांनी अनिल देशमुख यांना डिस्चार्ज दिला होता.
5 ते 15 फेब्रुवारीदरम्यान देशमुख हे कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात होते
वाझेंच्या भेटीच्या काळात अनिल देशमुख हे कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये होते.
परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांबाबत शरद पवार देत आहेत स्पष्टीकरण
शरद पवार यांची पत्रकार परिषद सुरु
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT