साडेसहा वर्षांनी इंद्राणी मुखर्जी तुरुंगाबाहेर, पहिली प्रतिक्रिया देत म्हणाली….
शीना बोरा हत्याकांडामुळे अवघा देश हादरला होता. इंद्राणी मुखर्जी ही या प्रकरणातली मुख्य आरोपी होती. तिला साडेसहा वर्षांनी जामीन मंजूर झाला. बुधवारी म्हणजेच १८ मे रोजी इंद्राणीला जामीन मिळाला. आज त्याची प्रत मुंबईतल्या भायखळा तुरुंगाला प्राप्त झाली त्यानंतर इंद्राणी साडेसहा वर्षांनी तुरुंगाबाहेर पडली आहे. यानंतर तिने पहिली प्रतिक्रियाही दिली आहे. इंद्राणी मुखर्जी तुरूंगाबाहेर पडल्यावर काय […]
ADVERTISEMENT

शीना बोरा हत्याकांडामुळे अवघा देश हादरला होता. इंद्राणी मुखर्जी ही या प्रकरणातली मुख्य आरोपी होती. तिला साडेसहा वर्षांनी जामीन मंजूर झाला. बुधवारी म्हणजेच १८ मे रोजी इंद्राणीला जामीन मिळाला. आज त्याची प्रत मुंबईतल्या भायखळा तुरुंगाला प्राप्त झाली त्यानंतर इंद्राणी साडेसहा वर्षांनी तुरुंगाबाहेर पडली आहे. यानंतर तिने पहिली प्रतिक्रियाही दिली आहे.
इंद्राणी मुखर्जी तुरूंगाबाहेर पडल्यावर काय म्हणाली?
आज मी मोकळ्या हवेत श्वास घेतो आहे. गेल्या सात वर्षात पहिल्यांदा… यासाठी मी आनंदी आहे. आज भारतीय न्यायव्यवस्थेवर पुन्हा एकदा विश्वास बसला आहे. प्रत्येकाने आपल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे. या सगळ्या प्रकरणात मी आणि पीटर वेगळे झालो. मात्र मी त्याला आणि इतर कुणालाही दोष देणार नाही. मी सध्या माझ्या तुरुंगातल्या दिवसांवर पुस्तक लिहिलं आहे. लवकरच ते प्रकाशित केलं जाईल. त्याबद्दल मी मीडियाला सांगेनच.
तुरुंगाने मला व्यक्ती म्हणून बदललं. मी जास्त सहनशील झाले आहे. मी माफ करायलाही शिकले आहे. मला तुरुंगात विविध प्रकारची माणसं भेटली. काही अट्टल गुन्हेगारही होते. प्रत्येक वाईट माणसात काहीतरी चांगली गोष्ट असतेच. असं इंद्राणी मुखर्जीने म्हटलं आहे.
