Sindhudurg: मालवणमधील तारकर्ली बोट दुर्घटनेत शिवसेना आमदाराच्या 30 वर्षीय पुतण्याचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मालवण: मालवण तारकर्ली बोट दुर्घटनेमध्ये मृत झालेला आकाश देशमुख (वय 30 वर्ष) हा अकोल्याचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांचा पुतण्या असल्याचे समोर आले आहे. आकाश देशमुख याचा या बोट दुर्घटनेमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ADVERTISEMENT

आकाश देशमुख हा अकोल्यातील एक हरहुन्नरी युवक होता. शिवसेनेचे अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांचा तो सख्खा पुतण्या होता. आकाशाच्या वडीलांचे काही वर्षापूर्वीच निधन झालं होतं. आपलं शिक्षण बीए आणि यानंतर इंजिनिअरिंग झाल्यानंतर आकाश सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेचे कंत्राट घेऊन काम करत होता.

आकाश हा आपली आई, विवाहित बहीण आणि भाऊजी अशी सगळी मंडळी अकोल्यातून पर्यटनासाठी मुंबईला निघाले होते. पण मुंबईला पोचल्यानंतर मध्येच त्यांचा प्लान बदलला आणि ते पर्यटनासाठी थेट मालवणात दाखल झाले.

हे वाचलं का?

मालवण फिरल्यानंतर काल (24 मे) सकाळी ते तारकर्ली येथे आले आणि त्यांच्या मनात स्कुबा डायव्हिंग करण्याची इच्छा निर्माण झाली. हे सगळे कुटुंबीय तारकर्ली किनाऱ्यावरून समुद्रात बोटीतून स्कुबा डायव्हिंगसाठी खोल समुद्रात गेली. स्कुबा डायव्हिंग आटोपून येत असताना सोसाट्याचा वारा सुटला आणि त्यामुळे आलेल्य प्रचंड लाटेत ही बोट पलटी झाली. याच दुर्घटनेत आकाश देशमुखचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात दुर्घटनेत तब्बल वीस पर्यटक बुडाले होते. जे पर्यटनासाठी मालवणमध्ये आले होते.

सुदैवाने या अपघातात आकाशची आई, बहिण आणि भाऊजी वाचले आहेत. आपल्या डोळ्यांदेखत झालेल्या आपल्या मुलाचा व भावाच्या मृत्यू हा आई आणि बहिणीसाठी फार मोठा धक्का आहे.

ADVERTISEMENT

Sindhudurga: मालवण हादरलं, तारकर्ली समुद्रात 20 पर्यटकांसह बोट बुडाली, दोघांचा मृत्यू

ADVERTISEMENT

नितीन देशमुख हे शिवसेनेचे अकोल्याचे आमदार आहेत. आकाश देशमुख हा आमदार नितीन देशमुख यांचा राईट हॅन्ड होता. त्यांच्या प्रत्येक कामामध्ये तो जातीनिशी लक्ष देत असे. आकाशाच्या निधनाने आमदार नितीन देशमुख यांना प्रचंड मोठा धक्का बसला आहे. या घटनेने नितीन देशमुख यांच्या अकोल्यातील निवासस्थानी शोककळा पसरली आहे. या घटनेचे वृत्त ऐकताच आमदार नितीन देशमुख यांना धक्का बसला आहे. आकाश देशमुख हा अकोल्यातील देशमुख परिवारातील एक हसतमुख चेहरा होता. त्याच्या अकाली निधनाने अकोल्यामध्ये शोककळा पसरली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT