Shiv Sena:’PM मोदींनी ‘त्या’ वेदनेची खपली उचकटून काढली’, ‘सामना’तून टीकेचे बाण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी ‘फाळणी वेदना स्मृतीदिना’ची (Partition Horrors Remembrance Day) घोषणा करुन वेदनेची खपली उचकटून काढली आहे. अशी टीका शिवसेनेचं (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून (Saamana) करण्यात आली आहे. सामनाच्या अग्रलेखात फाळणी आणि त्याविषयी भाष्य करताना पंतप्रधान मोदींवर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

‘फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या की या स्मृतींना कायमची तिलांजली देऊन वेदना देणाऱ्यांवर प्रहार करायचा यावर चिंतन झाले असते तर बरे झाले असते.’ असा सल्लाही पंतप्रधान मोदींना अग्रलेखातून यावेळी देण्यात आला आहे.

‘फाळणीमुळे दुंभगलेली मने दुरुस्त करण्यासाठी अटलबिहारी हे पंतप्रधान असताना लाहोरला ‘बस’ घेऊन गेले होते. तसेच सध्याचे पंतप्रधान मोदीही तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीसाठी अचानक गेले होते. म्हणजे देशातील फाळणीची वेदना संपावी असं मोदींच्याही मनात होतं. पण आता त्यांनी त्या वेदनेची खपली उचकटून काढली आहे.’ असं यावेळी म्हटलं आहे. त्यामुळे आता याप्रकरणी भाजप नेमकी काय प्रतिक्रिया देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

‘सामना’च्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:

  • इंदिरा गांधींनी पाकिस्तानची फाळणी घडवून पहिल्या फाळणीच्या वेदनेवर फुंकर घातली. पाकिस्तानच्या द्विराष्ट्रवादाचा पायाच उखडून टाकला. फाळणीची वेदना होती व आहेच. फक्त त्या वेदनेतून आणखी एका फाळणीची बिजे रोवली जाऊ नयेत हे सध्याच्या राज्यकर्त्यांनी पाहायला हवे. कश्मीरातून विस्थापित झालेल्या पंडितांना त्यांचा हक्क व खोऱ्यातली घरे परत मिळाली तरी बरेच काही साध्य होईल . फाळणीच्या वेदनेइतकेच कश्मिरी पंडितांच्या जखमांचे क्रणही देशाला अस्वस्थ करीत आहे.

ADVERTISEMENT

  • फाळणीच्या वेदनेचा दाह फक्त ‘उक्ती’ ने शमणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष ‘कृती’ देखील करावी लागेल. विद्यमान सत्ताधारी ती करणार आहेत काय? देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्याचा उत्सव वर्षातून एकदा साजरा होतो, पण फाळणीची वेदना सदैव मन जाळीत असते. ही आग कशी विझवणार?

  • ADVERTISEMENT

    • पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस एक घोषणा केली, ही घोषणा काय?, पंतप्रधानांनी फाळणीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. देशाच्या फाळणीच्या वेदना विसरल्या जाऊ शकत नाहीत म्हणून 14 ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी वेदना स्मृतिदिन’ म्हणून ओळखला जाईल, अशी घोषणा आपले पंतप्रधान मोदी यांनी केली.

  • देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना मोदी यांना फाळणीच्या वेदनेने अस्वस्थ केले व त्यांनी त्या कटू आठवणींना उजाळा दिला. फाळणी झाली. भारत-पाकिस्तान नावाचे दोन स्वतंत्र देश निर्माण झाले. दीडशे वर्षांच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी हिंदू आणि मुसलमान अशा दोन्ही समाजांनी रक्त सांडले.

    • मुस्लिम लीगने धर्माधिष्ठीत द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार करून पाकिस्तान या इस्लामी राष्ट्राची स्थापना केली. द्विराष्ट्रवादाचे बीज सर सय्यद अहमद यांच्यापासूनच रुजले होते. हिंदू व मुसलमान ही दोन वेगळी राष्ट्रे आहेत, हा सर सय्यद यांचा सिद्धांत होता. मुस्लिम लीगने त्याचा आश्रय घेतला. फाळणी मान्य करण्यात काँग्रेसच्या नेत्यांची जी अनेक कारणे होती त्यात फाळणीमुळे हिंदू-मुसलमानांचा प्रश्न मिटेल हे एक कारण होते. अर्थात फाळणीमुळे हिंदू-मुसलमान प्रश्न सुटला नाही.

    • पाकिस्तानने हिंदू निर्वासित पाठविण्याचे सत्र सुरुच ठेवले. भारतातून रेल्वे गाड्यांतून मुसलमान लाहोर-कराचीत जात होते. त्या रिकाम्या गाड्यांतून कत्तली झालेल्या हिंदूंचे मृतदेह पाठविण्यापर्यंत क्रौर्य टोकाला गेले. लाखांत स्त्रियांवर बलात्कार झाले. घर-संसार, नाती-गोती उद्ध्वस्त झाली. अफगाणिस्तानातील आताच्या तालिबानी हिंसेला मागे टाकणारे प्रकार त्यावेळी फाळणीदरम्यान झाले. भारताच्या पारतंत्र्याचा अंत हा असा रक्तरंजित ठरला व त्या वेदनेची ठसठस 75 वर्षांनंतरही कायम आहे.

    • देश दुभंगला तशी मने दुभंगली ती कायमचीच. ही दुभंगलेली मने दुरुस्त करण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना लाहोरला ‘बस’ घेऊन गेले. तसे सध्याचे पंतप्रधान मोदी हेसुद्धा पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीसाठी अचानक गेले.

    • म्हणजे दोन देशांतली फाळणीची वेदना संपावी आणि नवे पर्व सुरु व्हावे, असा विचार मोदींच्याही मनात होताच. आता त्यांनी त्या वेदनेची खपली उचकटून काढली. फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवूया व त्यासाठी 14 ऑगस्ट हा दिवस निवडला. 14 ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन आहे. फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या की या स्मृतींना कायमची तिलांजली देऊन वेदना देणाऱ्यांवर प्रहार करायचा यावर ‘चिंतन’ झाले असते तर बरे झाले असते. मुळात स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेस व समाजवादी चळवळीतले काही लोक होते.

    • फाळणीवर उतारा म्हणून भाजपने पाकव्याप्त कश्मीर पुन्हा जिंकण्याचा निर्धार केला. अखंड भारताचा गजर केला. फाळणीच्या वेदनेवर तोच उतारा होता, पण फाळणीच्या वेदनेचा प्रतिशोध घेण्याचे राष्ट्रकार्य फक्त इंदिरा गांधी करू शकल्या.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT