पतीने आधी गळा कापला..पुन्हा सैरावैरा झाला अन् पत्नीच्या छातीवर वार केले, नवऱ्याने बायकोला माहेरीच संपवलं!
Husband Killed Wife : बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यात एका पतीने त्याच्या पत्नीची माहेरीच निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना पीपरातकोठी परिसरातील झाखराच्या बलिया टोला येथे घडली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पतीने झोपेत असलेल्या पत्नीवर कुऱ्हाडीने केले वार

रक्ताचे सडे पडल्यानंतर कुटुंबियांना आली जाग

त्या गावात नेमकं घडलं तरी काय?
Husband Killed Wife : बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यात एका पतीने त्याच्या पत्नीची माहेरीच निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना पीपरातकोठी परिसरातील झाखराच्या बलिया टोला येथे घडली. सासरी आलेल्या पतीने झोपेत असलेल्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार केले. त्याने आधी पत्नीचा गळा कापला आणि नंतर छातीवर वार केले. मानती देवी (25) असं मृत महिलेचं नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी सुबोध मांझीला अटक केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असं की, सुबोध बाहेर राहून मजुरीचं काम करत होता. घटनेच्या दिवशी पत्नीसोबत त्याचं भांडणही झालं होतं. हत्येमागंच नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. सुबोध पाच दिवस आधी सासरी आला होता. तेव्हा तो सर्वांसोबत मिळून राहत होता. मंगळवारी रात्री त्या घरातील अंगणात सर्व कुटुंबियांसोबत झोपला. त्याची पत्नीही तिथे झोपली होती. जेव्हा सर्व लोक झोपले, तेव्हा सुबोधने त्याच्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार केले आणि तिची हत्या केली.
हे ही वाचा >> Breaking News: राष्ट्रवादीत मोठी खळबळ! माणिकराव कोकाटेंबाबत 'हा' निर्णय झाला, स्वत: अजित पवारांनीच CM फडणवीसांना सांगितलं तुम्ही...
जेव्हा शेजारी झोपलेले लोक जागे झाले, तेव्हा आरोपी सुबोध तिथून फरार झाला. मानती गेल्या सहा महिन्यांपासून माहेरी राहत होती. तिला चार वर्षांचा मुलगाही आहे. मृताचे वडिल मजुरी करण्यासाठी बाहेर गेले होते. पोलीस अधिकारी धनंजय कुमार यांनी म्हटलंय की, घटनास्थळावरून कुऱ्हाड जप्त करण्यात आली आहे. पोस्टमार्टम झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल.
तोंडावर रक्ताचे सडे पडल्याने बहिणींना आली जाग
सुबोधने जेव्हा मानतीचा खून केला, तेव्हा गळ्यातून रक्ताचे सडे बाहेर पडले होते. त्यामुळे बाजूला झोपलेल्या मानतीच्या बहिणींना जाग आली. दोघीही जोरजोरात ओरडू लागल्या. त्यानंतर त्यांनी इतर लोकांना जागं केलं. पण तोपर्यंत सुबोध फरार झाला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीत घटनेच्या आधीच्या रात्री वादविवाद झाले होते. त्यावेळी सुबोधच्य सासूने त्याला म्हटलं होतं की, तू दुसऱ्या दिवशी सकाळी मानती सोबत घेऊन घरी जा. पण आरोपी सुबोधने रात्रीच पत्नीची निर्घृण हत्या केली.