काकाची वासना बळावली, पुतणीवरच केली बळजबरी... हात जोडले तरी नाही ऐकलं!
बिहारमधील भागलपुर जिल्ह्यात एका गावातील 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच काकाने बलात्कार केल्याचं संतापजनक वृत्त समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
11 वर्षीय अल्पवयीन भाचीवरच केला बलात्कार
भाचीलाच बनवलं वासनेची बळी
हाथ जोडून विनवण्या केल्या तरीही निर्दयीपणे अत्याचार
Rape Case: बिहारमधील भागलपुर जिल्ह्यात नातेसंबंधाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. या जिल्ह्यातील नाथनगर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका गावातील 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच काकाने बलात्कार केल्याचं संतापजनक वृत्त समोर आलं आहे. मंगळवारी (29 जुलै) सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी पीडित मुलगी जोरजोरात ओरडत असताना स्थानिक लोकांना या प्रकरणाबाबत कळालं.
पीडित मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पीडितेच्या काकाला पडकण्यात आलं. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नाथनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी तिथे पोहचले आणि त्यांनी लगेच आरोपीला अटक केली.
भाचीवरच केला बलात्कार
या प्रकरणासंदर्भात पीडितेच्या वडिलांनी नाथनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी बागेत फूलं तोडण्यासाठी जात होती. आरोपी सुद्धा आधीच बागेत उपस्थित होता. आरोपी नात्याने पीडित मुलीचा काका लागत असून बागेत गेलेल्या अल्पवयीन त्या मुलीवर त्याची घाणेरडी नजर पडली. आरोपीने नात्याचा आणि वयाचा काहीच विचार न करता तिच्यासोबत घृणास्पद केलं. त्यावेळी पीडित मुलगी जोरजोरात ओरडत होती, इतकेच नव्हे तर तिने आरोपीला हात जोडून विनंती देखील केली. मात्र, आरोपीने कशाचाही विचार न करता तिच्यावर बलात्कार केला.
हे ही वाचा: Shailesh Jejurikar: P&G कंपनीच्या मोठ्यापदावर मराठमोळा माणूस, पहिल्यांदाच भारतीय बनणार CEO; किती मिळणार पगार?
पीडितेच्या मते, तिने त्या नराधमापासून स्वतःला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्याने तिचं काहीच ऐकलं नाही. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने अडीच वर्षांपूर्वी त्याच गावातील एका मुलीसोबत असंच घाणेरडे कृत्य केलं होतं. परंतु त्यावेळी कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नव्हती.










