एक्सप्रेस वेवरील 'तो' पॉईंट जिथे कारमध्ये कपलचे इंटिमेंट क्षण, महिलांचे अश्लील व्हिडिओही झाले रेकॉर्ड
Crime News : अँटी-ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीमचा गैरवापर करत जोडप्यांचे अश्लील व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद करण्यात आले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
एक्सप्रेसवेच्या देखरेख यंत्रणेचा गैरवापर
जोडप्यांनी जवळीक साधतानाचे व्हिडिओ फुटेज समोर
Crime News : पॉर्न वेबसाईट आणि सोशल मीडियावर अनेकदा जोडप्यांचे व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण हेच व्हिडिओ व्हायरल होण्याचं कारण हे अनेकदा जोडपेच असतात. काही वेळा त्यांचे अश्लील कृत्य काही लोक आपल्या कॅमेऱ्यात देखील कैद करताना दिसतात आणि नंतर व्हायरल करतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्सप्रेसमध्ये घडली आहे. याची सध्या जोरदार चर्चा होताना दिसते.
हे ही वाचा : "चल तुला शाळेत सोडतो" असं सांगून चिमुरडीला खोलीत नेलं... पुण्यातील लाज आणणारा प्रकार
अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा आरोप
आशुतोष सरकार या तरुणावर जोडप्यांचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा आरोप करण्यात आला आहे. तो पूर्वांचल एक्सप्रेवेवरील टोल प्लाझावर अँटी-ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीमचा असिस्टंट मॅनेजर होता. आशुतोष ज्या कंपनीत कार्यरत होता त्याच कंपनीने त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. ही घटना हलियापूर परिसरातील आहे.
एक्सप्रेसवेच्या देखरेख यंत्रणेचा गैरवापर
पूर्वांचल एक्सप्रेसवेवरील टोल प्लाझावर एटीएम सिस्टीम बसवण्यात आली आहे. ज्याचा वापर हा वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो. या सिस्टीमद्वारे, एक्सप्रेसवेवरील बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे वाहनांचे निरीक्षण केले जाते. पण, आता एटीएमचे सहाय्यक व्यवस्थापक आशुतोष सरकार यांनी एक्सप्रेसवेच्या देखरेख यंत्रणेचा गैरवापर केला.
जोडप्यांनी जवळीक साधतानाचे व्हिडिओ फुटेज
एक्सप्रेसवेवर जोडप्यांच्या वाहनांमध्ये जवळीक साधतानाचे व्हिडिओ फुटेज आशुतोष काढत असे. तो प्रवाशांना ब्लॅकमेल करायचा आणि नंतर पैसे उकळायचा, नंतर व्हिडिओ व्हायरल करायचा. आशुतोष विश्वास यांनी हलियापूर एक्सप्रेसवेजवळील गावांमधील महिला आणि मुलींना असंच टार्गेट केल्याचा आरोप आहे. त्यांच्या बाहेर शौच करतानाचे व्हिडिओ बनवून ते व्हायरल केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.










