Maharashtra Weather : 'या' भागात कोरडे हवामान राहण्याची शक्यता, तर काही भागांत थंडीची लाट
Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाने (IMD) जाहीर केलेल्या अंदाजानुसार, 10 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्यात सर्वसाधारणपणे कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भारतीय हवामान विभागाने (IMD) जाहीर केलेल्या अंदाजानुसार
महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे कोरडे हवामान राहण्याची शक्यता
Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाने (IMD) जाहीर केलेल्या अंदाजानुसार, 10 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्यात अंतर्गत भागात थंडीची लहर (cold wave) येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जाणून घेऊयात हवामानाचा राज्यातील एकूण अंदाज.
हे ही वाचा : "चल तुला शाळेत सोडतो" असं सांगून चिमुरडीला खोलीत नेलं... पुण्यातील लाज आणणारा प्रकार
कोकण विभाग :
कोकण विभागात मुख्यत्वे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि मुंबई यांचा समावेश होतो. यापैकी मुंबईमध्ये रात्रीच्या वेळी हलक्या प्रमाणात थंडीची शक्यता असली तरीही ती मर्यादीत राहील.
मध्य महाराष्ट्र विभाग :
मध्य महाराष्ट्र विभागात धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांपैकी धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे येथे हवामान विभागाने थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.










