एक्सप्रेस वेवर कारमध्ये सुरू असलेल्या शारीरिक संबंधाचा Video नेमका कसा झाला रेकॉर्ड?

मुंबई तक

पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर जोडप्याचे प्रायव्हेट व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कॅप्चर झाले असून ते आरोपीकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले.

ADVERTISEMENT

कपलचा प्रायव्हेट Video नेमका कसा झाला रेकॉर्ड?
कपलचा प्रायव्हेट Video नेमका कसा झाला रेकॉर्ड?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एक्स्प्रेस वेवर कारमधील जोडप्याचे रोमॅन्टिक क्षण कॅप्चर!

point

जोडप्याचा प्रायव्हेट व्हिडीओ नेमका कसा झाला रेकॉर्ड?

Crime News: उत्तर प्रदेशातील सुल्तानपूरमधील पूर्वांचल एक्सप्रेसवेच्या टोल प्लाझावरील अँटी ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमचा मॅनेजर आशुतोष विश्वास याच्यावर नवविवाहित जोडप्याचा खाजगी व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी व्यवस्थापक आशुतोष विश्वास याला निलंबित करण्यात आलं. आशुतोषवर एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्या जोडप्यांचे बेकायदेशीरपणे खाजगी व्हिडिओ कॅप्चर केल्याचा आणि त्या व्हिडिओच्या आधारे पीडित प्रवाशांकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे. पैसे मिळाल्यानंतर सुद्धा आरोपीने ते प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल केले. मात्र, हे व्हिडीओ सीसीटीव्ही मध्ये कॅप्चर होण्यासाठी नेमक्या कोणत्या बाबी कारणीभूत ठरल्या? सविस्तर जाणून घ्या. 

सार्वजनिक ठिकाणी पार्टनरसोबत रोमॅन्टिक क्षण 

सार्वजनिक ठिकाणी पार्टनरसोबत साधलेली जवळीक तुम्हाला अडचणीत आणू शकते. भारतीय कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी लैंगिक संबंध किंवा जवळीक साधण्यास प्रतिबंध आहे. म्हणून, जर एखादी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी पार्टनरसोबत अश्लील कृत्ये करताना दिसली तर दुसऱ्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. अशातच, संबंधित जोडप्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 294 अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. या गुन्ह्यासाठी तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

तसेच, अशा प्रकरणांमध्ये एखाद्या महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने गुन्हेगारी बळाचा वापर किंवा तिच्यावर हल्ला केला जात असेल, तर अशा परिस्थितीत कलम 354 लागू होऊ शकते. खरं तर, भारतीय कायदा आणि सामाजिक व्यवस्था सार्वजनिक ठिकाणी सभ्यता राखण्यावर भर देते. म्हणून, जर रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीला, शेजाऱ्याला किंवा पोलिस अधिकाऱ्याला तुमचे वर्तन अश्लील किंवा त्रासदायक वाटले तर ते तक्रार दाखल करू शकतात.

हे ही वाचा: एक्सप्रेस वेवर कारमध्ये जोडप्याचे शारीरिक संबंध... 'या' व्यक्तीने 'तो' व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप

एक्सप्रेसवेवरील हाय-टेक कॅमेऱ्यांकडे दुर्लक्ष

पूर्वांचल एक्सप्रेसवे प्रकरणात संबंधित जोडप्याने केलेली दुसरी मोठी चूक म्हणजे एक्सप्रेसवेवर बसवलेल्या हाय-टेक कॅमेऱ्यांकडे दुर्लक्ष करणं. अँटी ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमचा भाग म्हणून एक्सप्रेसवे सारख्या मोठ्या प्रोजेक्ट्सवर विविध ठिकाणी कॅमेरे बसवले जातात. त्यांचा उद्देश अपघात आणि ट्रॅफिक उल्लंघनांची नोंद करणे आहे. मात्र, महामार्गावर कॅमेरे असूनही या जोडप्याने ही चूक केली आणि याचा नंतर टोल प्लाझा व्यवस्थापक आशुतोषने गैरवापर केला. म्हणून, कॅमेरे बसवलेल्या ठिकाणी असे रोमँटिक क्षण टाळले पाहिजेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp