29 महानगरपालिका निवडणुकींबाबत सगळ्या मोठी बातमी, निवडणूक आयोगाचं नवं पत्रक आलं समोर

मुंबई तक

29 महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर तारखा पुढे ढकलल्या. जाणून घ्या याविषयी सविस्तर.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कार्यक्रमात मोठा बदल केला आहे. 26 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आलेले मूळ वेळापत्रक पूर्णपणे रद्द करून नवे सुधारित वेळापत्रक आज प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या सुधारित वेळापत्रकानुसार आता सर्व महत्त्वाच्या टप्प्यांच्या तारखा 5 ते 7 दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे उद्याच (10 डिसेंबर) प्रसिद्ध होणारी अंतिम मतदार यादी आता 15 डिसेंबरपर्यंत लांबली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने बदल केलेल्या तारखा

क्र. निवडणुकीचा टप्पा 

26/11/2025 च्या पत्रानुसार

निर्धारित केलेला दिनांक

हे वाचलं का?

    follow whatsapp