Shailesh Jejurikar: P&G कंपनीच्या मोठ्या पदावर मराठमोळा माणूस, पहिल्यांदाच भारतीय बनणार CEO; किती मिळणार पगार?
Shailesh Jejurikar P&G CEO: शैलेश जेजुरीकर हे P&G कंपनीचे सीईओ बनणार आहेत. ते पहिलेच भारतीय आणि मराठी व्यक्ती असतील जे 187 वर्ष जुन्या कंपनीचे CEO बनणार आहेत.
ADVERTISEMENT

वॉश्गिंटन: P&G कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या भारतीय व्यक्तीला CEO बनवले जात आहे. या पदासाठी निवड झालेल्या व्यक्तीचे नाव शैलेश जेजुरीकर आहे. 58 वर्षीय शैलेश 1 जानेवारी 2026 रोजी अधिकृतपणे पदभार स्वीकारतील. सध्याचे सीईओ जॉन मोलर कार्यकारी अध्यक्षपदी रूजू होतील, जिथे ते संचालक मंडळाचे नेतृत्व करतील आणि जेजुरीकर यांना सल्ला देतील. कंपनीने सांगितले की, मोलर यांच्या कार्यकारी अध्यक्षपदाच्या कार्यकाळासाठी कोणतीही कालमर्यादा नाही. P&G बोर्ड ते या पदावर किती काळ राहतील हे ठरवेल.
जाणून घ्या शैलेश जेजुरीकरांविषयी
हैदराबाद पब्लिक स्कूलचे माजी विद्यार्थी (आणि मायक्रोसॉफ्टचे CEO सत्य नाडेला यांचे वर्गमित्र), मुंबई विद्यापीठ आणि IIM लखनऊ (1989) जेजुरीकर हे जॉन मोलर यांची जागा घेतील. असे कंपनीने जाहीर केले आहे. 187 वर्षे जुन्या कंपनीचे ते पहिले आशियाई आणि भारतीय CEO असतील, ज्यांचे शिक्षण पूर्णपणे भारतीय शिक्षण प्रणालीतून झाले आहे.ृ
हे ही वाचा>> Personal Finance: रिटायरमेंट फंडचा सीक्रेट फॉर्म्युला, प्रत्येक जण विचारेल तुम्ही करोडपती कसे बनला?
अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या कारकिर्दीपूर्वी ही कंपनी स्थापन झाली होती. P&G ची स्थापना 1837 मध्ये इंग्लंडमध्ये जन्मलेल्या मेणबत्ती निर्माता विल्यम प्रॉक्टर आणि आयर्लंडमध्ये जन्मलेल्या साबण निर्माता जेम्स गॅम्बल यांनी केली होती. 1999 ते 2000 दरम्यानच्या अल्प कालावधीसाठी, जेव्हा P&G चे नेतृत्व नेदरलँड्समध्ये जन्मलेल्या डर्क जेगर यांनी केले होते, जेजुरीकर हे कंपनीचे नेतृत्व करणारे दुसरे बिगर-अमेरिकन सीईओ असतील.
जेजुरीकर यांनी त्यांचे बालपण भारतात घालवले आहे. 2023 च्या P&G अॅल्युमनी पॉडकास्टमध्ये त्यांनी सांगितले की, त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण मुंबई बाहेरील एका भागात सुरू केले होते. त्यांनी सांगितले की जवळची शाळा 45 मिनिटांच्या अंतरावर होती. आठवी इयत्ता असताना ते हैदराबादला गेले आणि बोर्डिंग स्कूलमध्ये ज्युनियर म्हणून प्रवेश घेतला.










