सोलापूर : बाळ आजारी असल्याने आजोबा रुग्णालयात घेऊन गेले, पण येताना भीषण अपघात; दोघांचाही जळून मृत्यू
Solapur Accident : नातू शंभू पाखरे(वय 2 वर्षे) याचा जागीच मृत्यू झाला तर भाजलेल्या अवस्थेत जखमी दत्तात्रय पाखरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र दुर्दैवाने दत्तात्रय पाखरे यांची प्राणजोत मालवली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोलापूर : बाळ आजारी असल्याने आजोबा रुग्णालयात घेऊन गेले,
पण येताना भीषण अपघात; दोघांचाही जळून मृत्यू
Solapur Accident : बार्शी- सोलापूर मार्गावर काळीज पिळटवून टाकणारी घटना घडली आहे. बार्शी सोलापूर मार्गावर मंगळवारी (दि.10) भीषण अपघात घडला आहे. भीषण अपघातात आजोबा आणि दोन वर्षांच्या नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मानेगाव येथील दत्तात्रय पाखरे हे तब्येत बिघडलेल्या नातू शंभूला घेऊन वैरागजवळील दवाखान्यात आले होते. उपचारानंतर दोघे घरी परतत असताना छत्रपती कार केअरसमोर हा हादरवून सोडणारा अपघात घडला.
दोन वर्षीय नातवाने आजोबाच्या कुशीतच प्राण सोडले
या अपघाता नंतर सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. भीषण अपघातात दोन वर्षीय नातवाने आजोबाच्या कुशीतच प्राण सोडले आहे. अपघात इतका भीषण होता की ,ज्या दुचाकी वाहनावर आजोबा आणि नातू जात होते ,त्या दुचाकीने पेट घेतला होता. नातू शंभू पाखरे(वय 2 वर्षे) याचा जागीच मृत्यू झाला तर भाजलेल्या अवस्थेत जखमी दत्तात्रय पाखरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र दुर्दैवाने दत्तात्रय पाखरे यांची प्राणजोत मालवली.
हेही वाचा : महिलांसोबत अनैतिक संबंध ते 50 खोके; निवडणुकीत सनसनाटी आरोप, पण आता तानाजी मुटकुळे आणि संतोष बांगर एकत्र
टिप्परने धडक दिली अन् अनर्थ घडला...
सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे मंगळवारी सकाळी अपघात घडला. दत्तात्रय पाखरे हे आपल्या नातवाला घेऊन वैराग येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आले होते. उपचार करून मूळ गावी मानेगाव येथे जाताना समोरून आलेल्या भरधाव टिप्परने दत्तात्रय पाखरे यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, आजोबांच्या कुशीत बसलेला चिमुकला शंभू जागीच ठार झाला. दत्तात्रय पाखरे गंभीर जखमी अवस्थेत आगीच्या लोटात सापडले.










