जोडप्याचा गाडीतील प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल, टोल प्लाझावरील कर्मचाऱ्याचं संतापजनक कृत्य! महिला आणि तरुणींना सुद्धा टार्गेट...

मुंबई तक

अँटी ट्र्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (ATMS)च्या मॅनेजरने हायवेवरून प्रवास करणाऱ्या लोकांचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून गाडीतील खाजगी क्षणांचे व्हिडिओ फुटेज काढून आणि नंतर ते सोशल मीडियावर व्हायरल करून प्रवाशांकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे.

ADVERTISEMENT

गाडीतील प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल..
गाडीतील प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जोडप्याचा गाडीतील प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल

point

टोल प्लाझावरील कर्मचाऱ्याचं संतापजनक कृत्य!

point

महिला आणि तरुणींना सुद्धा केलं टार्गेट

Crime News: उत्तर प्रदेशातील सुल्तानपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील पूर्वांचल महामार्गाच्या टोल प्लाझावरील अँटी ट्र्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (ATMS)च्या मॅनेजरवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संबंधित व्यक्तीने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून गाडीतील खाजगी क्षणांचे व्हिडिओ फुटेज काढून आणि नंतर ते व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून प्रवाशांकडून बेकायदेशीरपणे पैसे उकळल्याचा आरोप आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर, यंत्रणेची गोपनीयता आणि प्रवाशांच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

संबंधित घटना हलियापूरच्या पोलीस स्टेशन हद्दीत घडल्याची माहिती आहे. याच ठिकाणी पूर्वांचल एक्स्प्रेस टोल प्लाझावर ATMS सिस्टिम लावण्यात आली आहे. एक्सप्रेसवेवर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वाहनांवर लक्ष ठेवता येते आणि या सिस्टमवर देखरेख करण्यासाठी तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

हे ही वाचा: सोलापुरातील ऊसतोड कामगाराचे कर्नाटकातील महिलेशी अनैतिक संबंध, पत्नीचा कोयत्याने वार करुन काटा काढला

यंत्रणेच्या मॅनेजरवर गंभीर आरोप 

या सिस्टमचे मॅनेजर आशुतोष विश्वास हे एक्सप्रेसवेच्या देखरेख यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोप आहे. एक्सप्रेसवेवर आपल्या गाड्यांमध्ये जवळीक साधणाऱ्या जोडप्यांचे खाजगी व्हिडिओ फुटेज कॅप्चर केले जात होते. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, आरोपी आशुतोष विश्वास याने त्या खाजगी फुटेजचा वापर प्रवाशांना ब्लॅकमेल करण्यासाठी आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे वसूल करण्यासाठी केला. बदनामीच्या भीतीने  प्रवाशांना मोठी रक्कम मोजावी लागली. तसेच, पैसे मिळाल्यानंतर सुद्धा, आरोपीने प्रवाशांचे खाजगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप आहे. 

हे ही वाचा: शिंदेंच्या आमदाराचा नोटांचे बंडल रचतानाचा व्हिडीओ दानवेंकडून शेअर, आता महेंद्र दळवी समोर; चॅलेंज देत म्हणाले..

महिला आणि तरुणींना केलं टार्गेट

तक्रारीनुसार, आरोपी मॅनेजरने हलियापूर एक्स्प्रेसवेच्या आसपास राहणाऱ्या महिला आणि तरुणींना देखील टार्गेट केलं. त्यांचे बाहेर शौच करतानाचे व्हिडिओ बनवले आणि ते व्हायरल केले. काही पीडितांनी 2 डिसेंबर रोजी थेट मुख्यमंत्र्यांकडे या गंभीर प्रकरणाची तक्रार केली आणि आरोपी व्यवस्थापकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. आता, पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp