सोलापुरातील ऊसतोड कामगाराचे कर्नाटकातील महिलेशी अनैतिक संबंध, पत्नीचा कोयत्याने वार करुन काटा काढला
Solapur Crime : आरोपी जकप्पा पुजारी ऊसतोड कामगार असून, विजापूर जिल्ह्यातील एका महिलेसोबत त्याचे कथित प्रेमसंबंध असल्याचा संशय पत्नी सविताला बळावत होता. या प्रकरणावरून दाम्पत्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाद सुरू होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोलापुरातील ऊसतोड कामगाराचे कर्नाटकातील महिलेशी अनैतिक संबंध
पत्नीचा कोयत्याने वार करुन काटा काढला
Solapur Crime : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर गावात सोमवारी (दि.7) सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, अनैतिक संबंधांमुळे झालेल्या वादामुळे पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हत्ताळी (ता. चडचण, जि. विजापूर) येथील सविता जकप्पा पुजारी (वय 35) अशी मृत महिलेची ओळख असून, तिचा पती जकप्पा मणगेरी पुजारी याला पोलिसांनी अटक केली आहे.
अनैतिक संबंधांवरून सुरू झालेले वाद पेटले
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जकप्पा पुजारी ऊसतोड कामगार असून, विजापूर जिल्ह्यातील एका महिलेसोबत त्याचे कथित प्रेमसंबंध असल्याचा संशय पत्नी सविताला बळावत होता. या प्रकरणावरून दाम्पत्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाद सुरू होते. काही दिवसांपूर्वी ऊसतोडीच्या हंगामासाठी दोघे वडापूर येथील एका शेतात मुक्कामी आले होते. इथेही जुनाच मुद्दा समोर येताच रविवारी मध्यरात्रीनंतर सविता आणि जकप्पा यांच्यात मोठा वादंग झाला. अनैतिक संबंधांच्या आरोपांमुळे संतापलेल्या जकप्पाने परिस्थितीचे भान हरपले.
हेही वाचा : पालघरमध्ये रक्षक झाले भक्षक, महिलेला चौकशीसाठी बोलावलं, पोलीस ठाण्यातच... हवालदार झाला राक्षस
रागाच्या भरात पतीकडून कोयत्याने हल्ला
वाद चिघळताच जकप्पा हा संतापाच्या भरात गेला आणि जवळच असलेल्या कोयत्याने पत्नीच्या डोक्यावर तसेच गळ्यावर सलग वार केले. गंभीर जखमांमुळे सविताचा घटनास्थळीच मृत्यू झाला. आवाज ऐकून शेतात काम करणाऱ्या इतर कामगारांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली सविता मृतावस्थेत होती. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच गावात आणि परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलिस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर, प्रभारी सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर उधार, पीएसआय राजकुमार डांगे आणि फौजदार रवींद्र चव्हाण यांनी घटनास्थळाची पाहणी केली.










