लैंगिक 'पॉवर' जास्त हवी म्हणून तरूण करतात 'या' भयंकर गोष्टीचं सेवन, पण होतं भलतंच..

मुंबई तक

AIIMS Research : इंडियन जर्नल ऑफ सायकियाट्री 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या या अहवालानुसार, हल्ली तरुण स्टॅमिना वाढण्यासाठी अनेक प्रकारच्या औषधांचा वापर करतात. या औषधांमुळे शरीरावर साईड इफेक्ट होण्याची शक्यता असते.

ADVERTISEMENT

AIIMS research
AIIMS research
social share
google news

बातम्या हायलाइट

point

स्टॅमिना वाढवण्यासाठी तरुण उचलतात चुकीचे पावलं

point

एचआयव्हीसारखा रोग निर्माण होण्याची शक्यता

AIIMS Research : स्टॅमिना वाढवण्यासाठी हल्ली तरुण विविध औषधांचे सेवन करतात. या औषधामुळे स्टॅमिन्यात वाढ होईल असा तरुणांचा गोड गैरसमज आहे. याचा विपरीत परिणाम त्यांच्या आयुष्यावर होण्याची शक्यता असते. नुकतेच प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनात स्टॅमिन्यासाठी तरुण आणि पुरूष मंडळी नेमकी कोणते ड्रग्स घेतात औषधे घेतात हे महत्त्वाचं आहे. इंडियन जर्नल ऑफ सायकियाट्री 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या या अहवालानुसार, हल्ली तरुण स्टॅमिना वाढण्यासाठी अनेक प्रकारच्या औषधांचा वापर करतात. या औषधांमुळे शरीरावर साईड इफेक्ट होण्याची शक्यता असते.  यामुळे एचआयव्हीसारखा रोग निर्माण होऊ शकतो. म्हणजेच शरीरसंबंध ठेवण्यापूर्वी तरुण उत्तेजनाच्या गोळ्यांचा डोस घेतात. संशोधनातून असं काही दिसून आले की, परदेशांतील तरुणांप्रमाणे देशातील तरुण पिढी औषधांचं सेवन करू लागली आहे. 

हेही वाचा : बापरे..! अमरावतीत दहा वर्षीय मुलीच्या पोटातून काढला अर्धा किलो केसांचा गोळा, डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक सत्य

एम्स दिल्लीने केलेलं हे ऑनलाईन सर्वेक्षण 

संबंधित प्रकरणाचं संशोधन हे एम्स दिल्लीच्या नॅशनल डिपेंडन्स ट्रीटमेंट सेंटर ने केले आहे. एम्स एनडीडीटीसी येथील प्राध्यापक डॉ. सिद्धार्थ सरकार, प्राध्यापक डॉ. अंजू धवन आणि वरिष्ठ निवासी डॉ. वर्षा यांनी यावर संशोधन केलं. भारतातील तरुणांनी शरीरसंबंध समजून घेण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात 18 वर्षे वयाहून अधिक लोकांचा समावेश होता. एम्स दिल्लीने केलेलं हे पहिलेच ऑनलाईन संशोधन असं म्हणू शकतो. या सेशनमध्ये शरीरसंबंध ठेवण्यापूर्वी गोळ्यांचे सेवन केल्यास धोका निर्माण होईल असे सांगितले गेले. 

एम्स दिल्ली येथील राष्ट्रीय औषध अवलंबित्व उपचार केंद्राचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. सिद्धार्थ यांनी एका प्रसारमाध्यामाशी बोलताना सांगितलं की, हे एक ऑनलाईन सर्वेक्षण आहे. या ऑनलाईन सर्वेक्षणाचे नंतर संशोधन करण्यात आले होते. याच सर्वेक्षणात असे दिसून आले की, लोक शरीरसंबंध ठेवण्यासाठी औषध घेत असतात. दरम्यान, तरुणांमध्ये तसेच पुरुषांमध्ये औषध घेण्याचा ट्रेंड वाढण्याची कारणे आता समोर येऊ लागली आहेत. 

डॉ. सिद्धार्थ सराकार म्हणाले की, या ऑनलाइन सर्वेक्षणात 136 लोकांचा समावेश होता. त्यापैकी 75 टक्के पुरूष होते आणि 25 टक्के LGBTQ असल्याचे सांगण्यात येत आहे. 136 लोकांपैकी 46 जणांनी सांगितलं की, ते शरीरसंबंध ठेवण्यापूर्वी गोळ्या आणि औषध घेतात. यातील 7 लोक हे एचआयव्ही पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp