Shiv Sena Office: सुनावणी दरम्यान एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिला धक्का

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

eknath Shinde VS Uddhav Thackeray । Shiv Sena Crisis । Election Commission Of India । parliament । Lok Sabha : केंद्रीय निवडणूक आयोगातील (Eleciton Commission Of India) लढाई जिंकल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ताब्यात असलेल्या शिवसेनेची (Shiv Sena) सुत्रं हाती घेतली आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडून आता शिवसेनेची कार्यालये ताब्यात घेतली जात आहेत. यातच आता शिंदेंनी ठाकरेंना दिल्लीत (Delhi) झटका दिला आहे. जाणून घ्या काय घडलंय दिल्लीत? (lok sabha secretariat allots shiv sena office to shinde faction after election commission decision)

ADVERTISEMENT

16 आमदारांवरील अपात्रतेची कारवाई, राज्यपालांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिलेली शपथ या आणि इतर मुद्द्यांवरील सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू असतानाच एक बातमी समोर आली. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट लोकसभा सचिवालयाला पत्र पाठवलं होतं.

संसद भवनातील शिवसेनेचं कार्यालय देण्यासंदर्भात शिंदेंनी लोकसभा सचिवालयाला पत्र दिलेलं होतं. लोकसभा सचिवालयाने ही मागणी मान्य केली असून, संसद भवनातील खोली क्रमांक 128 शिवसेनेला दिलं आहे. सुप्रीम कोर्टात शिंदे विरुद्ध ठाकरे अशी लढाई सुरू असतानाच शिंदेंनी संसद भवनातील कार्यालय ताब्यात घेतलं आहे.

हे वाचलं का?

Maharashtra Crisis Live: …म्हणून उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला -सिब्बल

विधिमंडळ आणि बीएमसीतील कार्यालयेही घेतली ताब्यात

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांचं पारडं उद्धव ठाकरेंच्या विरोधात वरचढ झालं आहे. एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेवरील दावा निवडणूक आयोगाने मान्य केला असून, ट्रिपल टेस्टचा निकष लावत शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिलं आहे. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना शिंदेंच्या ताब्यात गेली आहे.

ADVERTISEMENT

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदेंनी विधिमंडळातील शिवसेनेचं कार्यालय ताब्यात घेतलं. इतकंच नाही, तर मुंबई महापालिकेत राजकीय पक्षाची कार्यालये आहेत. त्यातील शिवसेनेचं कार्यालयही ताब्यात घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी पक्ष कार्यालयावरून शिंदे गटात आणि ठाकरे गटात वाद झाला होता. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी ही कार्यालये सील केली होती.

ADVERTISEMENT

Maharashtra Political Crisis: बंडखोरी ते सेनेचा ताबा, शिंदेंनी कशी केली मात?

शिवसेना भवन आणि शाखांचं काय?

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्यानंतर शिवसेना शाखांवर शिंदे दावा करतील असं म्हटलं जात होतं. यावरून दोन्ही गटात संघर्ष पाहायला मिळू शकतो, असंही म्हटलं गेलं. दरम्यान, शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी याबद्दलची भूमिका स्पष्ट केली. ‘आम्हाला शिवसेना भवन नको. आम्हाला शाखा नको, केवळ, बाळासाहेबांचे विचार हवेत ते पुढे घेऊन चाललो आहोत’, असं केसरकर म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT