फडणवीसांचा व्हीडिओ दाखवत शिवसेना नेते विनायक राऊत यांनी राणेंना दाखवली ‘कुंडली’

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

नारायण राणे यांनी मोठ्या आवेशात ट्विट केलं होतं. मात्र आज त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे खोदा पहाड और निकला कचरा अशी होती. ईडीच्या नोटीसा येतील असं सांगितलं होतं मात्र पत्रकार परिषदेत काहीही नव्हतं. नारायण राणे हे भाजपच्या गुड बुक्समध्ये राहण्यासाठी सगळं करत आहेत. त्यांची लाचारी पाहून दया येते. सत्तेसाठीची लाचारी काय ते नारायण राणेंकडे पाहून कळतं असं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. ईडीसारख्या संस्थेला बदनाम करण्याचं काम नारायण राणे करत आहेत असाही आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आजही पुचाट आरोप केले आहेत. नारायण राणे यांनी केलेल्या आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नाही. खून पचवणे कठीण असतं असं मगाशी बोलले. नारायण राणेंचं वय झाल्याने त्यांना आता त्याचा भूतकाळ आठवत नसेल. इतरांवर आरोप करण्याऐवजी सिंधुदुर्गमध्ये खून, मारामारी असे अनेक गुन्हे कुणावर दाखल आहेत बघा. ED चं काय चाललं आहे ते आम्हाला माहित आहे असंही विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

ज्या पद्धतीने नारायण राणेंच्या कारकिर्दीत खून, मारामारी, खंडणी असे जे काही नऊ वर्षे प्रकार होत होते. रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, मंचेकर या सगळ्यांचे खून कुणी केले? असाही प्रश्न विनायक राऊत यांनी विचारला. श्रीधर नाईक यांच्या खुनामध्ये आरोपी म्हणून कुणाचं नाव होतं? ते सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. तुम्हीपण आम्हाला गोष्टी जाहीर करायला लावू नका. या सगळ्यामागे खरं सूत्रधार कोण होतं ते माहित आहे. नारायण राणेंची कुंडली विधान परिषदेत ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना काढली होती ती देखील सगळ्यांना माहित आहे. असं म्हणत त्यांनी तो व्हीडिओही लावला. नारायण राणेंच्या कुंडलीचं वाचन ज्या प्रकारे केलं गेलं होतं तो व्हीडिओही लावण्यात आला.

हे वाचलं का?

आम्ही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटून सिंधुदुर्गात ज्या राजकीय हत्या झाल्या त्याची पुन्हा चौकशी करा अशी मागणी करणार आहोत असंही विनायक राऊत यांनी स्पष्ट केलं. या हत्यांमागे जे खरे गुन्हेगार होते त्यांचा शोध घ्या आणि अन्यायाला वाचा फोडा असंही आम्ही सांगणार नाही. नारायण राणेंसारख्या माणसाने भ्रष्टाचाराचे आरोप करणं यासारखा दुसरा विनोद असूच शकत नाही असंही विनायक राऊत म्हणाले. किरीट सोमय्यांनी नारायण राणेंचा कोणकोणता कसा संबंध आहे किती कोटींचा व्यवहार आहे ते सांगितलं होतं. त्याचं काय झालं असाही प्रश्न राऊत यांनी विचारला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT