उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसल्याने भाजपच्या नेत्यांना बोचतय – शिवसेना आमदाराचा हल्लाबोल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– ज़का खान, बुलढाणा प्रतिनिधी

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीवरुन गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच बुधवारपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे सभागृहात हजर राहिले नाहीत. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा पुढे करत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी राज्याचा कारभार रश्मी ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्याचं वक्तव्य केलं होतं. यावर शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रीया देत भाजप नेत्यांचा समाचार घेतला आहे.

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आजारी आहेत म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी करणं दुर्दैवी आहे. याआधी अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरही शस्त्रक्रीया झाली होती, त्यावेळी त्यांनी राजीनामा दिला होता का? भाजपच्या अनेक मुख्यमंत्र्यांवर अशाच प्रकारे शस्त्रक्रीया झाल्या आहेत त्यावेळी त्यांनी राजीनामा दिला होता का? शस्त्रक्रीया किंवा आजार हे नैसर्गिक आहेत. भाजपच्या वाचाळ नेत्यांना आता काहीही बोलायला उरलेलं नाहीये, म्हणून अशी नालायक विधानं केली जात आहेत.”

हे वाचलं का?

Assembly Winter Session : उद्धव ठाकरेंचा आदित्य ठाकरेंवरही विश्वास नसेल -चंद्रकांत पाटील

भाजपच्या नेत्यांना खरंतर लाज वाटायला हवी. एखाद्याच्या दुःखद प्रसंगात आपण त्याला धीर देण्याचं काम करायला हवं. पण ही लोकं टिंगळ-टिवाळी करतात. मुख्यमंत्री आजारी असतानाही आघाडी सरकारचं काम कुठेही थांबलेलं नाही. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर उद्धव ठाकरे बसलेत हे भाजपच्या नेत्यांना बोचतंय, असं म्हणत संजय गायकवाड यांनी चंद्रकांत पाटलांचा समाचार घेतला आहे.

ADVERTISEMENT

‘भविष्यात रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करणार आहात जाहीर करा’-नितेश राणे

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर असल्याचा मुद्दा माध्यमांनी मुद्दा उपस्थित केला. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री आजारी असल्यानं गैरहजर असणं स्वाभाविक आहे. आमचा आग्रह इतकाच आहे आणि नियमही असा आहे आहे की, तुम्हाला कुणाकडे तरी पदभार द्यावा लागतो. त्याची एक मोठी प्रक्रिया असते. त्याची माहिती राज्यपालांना द्यावा लागतो. तुम्ही राज्यपालांना मानायचं ठरवलं नाही, तरी राज्यपालांशिवाय काही करू शकत नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“त्यांचा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये…. अन्य दोन पक्षाबद्दल त्यांचा अविश्वास असणं स्वाभाविक आहे. कारण त्यांनी पदभार घेतला तर सोडणारच नाहीत. पक्षामध्येही त्यांचा कुणावरही विश्वास नसेल, त्यांनी आदित्य ठाकरेंकडे पदभार द्यायला पाहिजे”, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

‘आदित्य ठाकरेंकडे पदभार का देत नसतील’, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधीनींकडून विचारण्यात आला. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘बहुदा मुलावर विश्वास नसेल.’

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT