आमची BJP सोबत मैत्री, याचा अर्थ आम्ही सरकार बनवू असा नाही-संजय राऊत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेसोबत आमचं काही शत्रुत्व किंवा धुऱ्याचा वाद नाही. युतीबाबत जर-तरच्या गोष्टी मी करणार नाही योग्यवेळी परिस्थितीनुसार निर्णय घेऊ असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केलं होतं. त्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘देवेंद्रजी म्हणाले ते योग्यच आहे. मतभेद आहेत, आमचे रस्ते वेगळे आहेत पण मैत्री कायम आहे. मात्र कुणीही याचा अर्थ आम्ही सरकार बनवू असा घेऊ नये कारण त्याचा अर्थ तसा होत नाही.’

ADVERTISEMENT

‘देवेंद्रजी म्हणाले ते योग्यच आहे. मतभेद आहेत, आमचे रस्ते वेगळे आहेत पण मैत्री कायम आहे. मात्र कुणीही याचा अर्थ आम्ही सरकार बनवू असा घेऊ नये कारण त्याचा अर्थ तसा होत नाही.’

संजय राऊत, खासदार शिवसेना

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून हेच सांगत होतो की आमच्यात मतभेद आहेत. आमचे मार्ग आता वेगळे झाले आहेत. मात्र मैत्री कायम आहे. मात्र याचा अर्थ असा होत नाही की आम्ही सरकार स्थापन करू. परिस्थितीनुसार युतीचा निर्णय घेतला जाईल असं जे देवेंद्र फडणवीस म्हणाले त्याबाबत मला माहित नाही, त्यांच्याकडे कदाचित माझ्यापेक्षा जास्त माहिती असू शकते असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

हे वाचलं का?

महाविकास आघाडीचं सरकार हे उत्तम चाललं आहे. हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे त्यामुळे कुणीही काळजी करण्याचं कारण नाही असं सांगत तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे हेदेखील संजय राऊत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. राज्याचं अधिवेशन सुरू झालं आहे. यावेळी विरोधकांनी हंगामा करू नये. दोन दिवसात महाराष्ट्राच्या प्रश्नांची चर्चा अधिवेशनात केली पाहिजे. हंगामा केला तर चर्चा कशी होईल असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांताज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधला नाही. त्याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले की ते पत्रकारांशी नक्की बोलतील. विऱोधकांनाही चहापानालाही बोलवण्यात आलं नव्हतं. तसंच मुख्यमंत्र्यांनी रविवारी म्हणजेच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रसार माध्यमांशी संवादही साधला नाही. या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी टीकाही केली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT