NIA कडे तपास दिल्यामुळे सत्य बाहेर येईल असं नाही – संजय राऊत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणी राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवला आहे. मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्यातील संबंधांमुळे विरोधीपक्षाने या प्रकरणाचा तपास NIA कडे सोपवण्याची मागणी केली आहे. विरोधकांच्या या मागणीचा शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे.

ADVERTISEMENT

“मनसुख हिरेन यांचा झालेला मृत्यू खरंच दुर्दैवी आहे. ही घटना खरंच धक्कादायक आहे. ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे आणि ही शंका लवकरात लवकर दूर व्हायला हवी. हिरेन यांच्या मृत्यूचं भांडवल व्हायला नको. तो निरपराध व्यक्ती होता. त्यांच्या मृत्यूमागचं सत्य गृहखातं जितक्या लवकर समोर आणले तेवढं या सरकारसाठी हे चांगलं ठरणार आहे.” संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते.

मला तपासयंत्रणांकडून त्रास दिला जातोय!

हे वाचलं का?

या घटनेनंतर विरोधीपक्ष सरकारला धारेवर धरत आहे. परंतू सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं चुकीचं असल्याचंही राऊत म्हणाले. हिरेन यांच्या कुटुंबाचा आक्रोश हा व्यथित करणारा आहे. विरोधी पक्ष यामध्ये NIA कडून तपास करण्याची मागणी करतोय. परंतू NIA कडे तपास देऊन सत्य बाहेर येईल अशातला भाग नाही. मुंबई पोलीस अशा प्रकरणांचा तपास करण्यासाठी सक्षम आहेत. गृहमंत्र्यांनी ज्या ATS कडे हा तपास सोपवला आहे, त्याचे अधिकारी या घटनेचा तपास चांगल्या पद्धतीने करतील असा विश्वासही यावेळी राऊत यांनी व्यक्त केला.

ठाणे पोलीसांचा भाग नसलेले सचिन वाझे पोस्ट मार्टमच्या ठिकाणी कसे?

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT