फडणवीसांना शह देण्यासाठी केंद्राने Narayan Rane यांच्यासारखं बुजगावणं पुढे आणलं – विनायक राऊतांची टीका

मुंबई तक

जन आशिर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय लघू उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं दर्शन घेतलं. यानंतर शिवसैनिकांनी ही जागा गोमूत्र आणि दुधाने शुद्ध करुन घेतल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा वाद रंगला आहे. त्यातच रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनीही राणेंवर टीकेची तोफ डागली आहे. देवेंद्र फडणवीस यांना नामोहरम करण्यासाठी केंद्र सरकार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

जन आशिर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय लघू उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं दर्शन घेतलं. यानंतर शिवसैनिकांनी ही जागा गोमूत्र आणि दुधाने शुद्ध करुन घेतल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा वाद रंगला आहे. त्यातच रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनीही राणेंवर टीकेची तोफ डागली आहे.

देवेंद्र फडणवीस यांना नामोहरम करण्यासाठी केंद्र सरकार नारायण राणेंचा बुजगावण्यासारखा वापर करतंय, यासाठीच त्यांना पुढे आणलं आहे. फडणवीसांना शह देण्यासाठी राणेंचा वापर केला जाणं हे भाजपचं दुर्दैव आहे. नारायण राणेंसारख्या बाटग्याला बाळासाहेब कधीच आशिर्वाद देणार नाहीत. बाळासाहेबांनी नारायण राणेंना शाप दिला आहे की तुझ्यासारखा कृतघ्न आणि नतद्रष्ट माणूस महाराष्ट्रात जन्माला येऊ नये, असं म्हणत विनायक राऊतांनी राणेंवर टीका केली.

स्वतःचं मन शुद्ध करा, बाळासाहेबांचं स्मारक शुद्ध करणाऱ्या शिवसेनेला Narayan Rane यांनी सुनावलं

यावेळी नारायण राणेंसोबत समाधीस्थळावर आलेल्या फडणवीस आणि प्रवीण दरेकरांनाही राऊतांनी टोला लगावला. “देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर अनेकदा स्मारकावर बाळासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. तो त्यांचा अधिकार आहे. परंतू त्यांनीही नारायण राणेंच्या पदराआड लपून स्मारकाला भेट देऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न केला”.

हे वाचलं का?

    follow whatsapp