Shivsena संपर्क अभियानाला उस्मानाबादमध्ये गालबोट, शिवसैनिकांमध्येचं बॅनरबाजी वरुन हाणामारी
गणेश जाधव, प्रतिनिधी, उस्मानाबाद उस्मानाबाद येथे शिवसंपर्क अभियानाला गालबोट लागले असून बॅनरवर फोटो नसल्याच्या कारणावरून शिवसैनिक आपापसात भिडले आहेत. शिवसेनेचे आमदार डॉ तानाजीराव सावंत आणि माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या समर्थकात वाद पुन्हा चव्हाट्यावर आला असुन झालेल्या राड्यात शिवसेना तालुकाप्रमुख अण्णा जाधव गंभीर जखमी झाले आहेत. सध्या राज्यभर शिवसेनेकडून संपर्क अभियान सुरू आहे. यामध्ये सर्वसामान्यांचे […]
ADVERTISEMENT
गणेश जाधव, प्रतिनिधी, उस्मानाबाद
ADVERTISEMENT
उस्मानाबाद येथे शिवसंपर्क अभियानाला गालबोट लागले असून बॅनरवर फोटो नसल्याच्या कारणावरून शिवसैनिक आपापसात भिडले आहेत. शिवसेनेचे आमदार डॉ तानाजीराव सावंत आणि माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या समर्थकात वाद पुन्हा चव्हाट्यावर आला असुन झालेल्या राड्यात शिवसेना तालुकाप्रमुख अण्णा जाधव गंभीर जखमी झाले आहेत. सध्या राज्यभर शिवसेनेकडून संपर्क अभियान सुरू आहे. यामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न आणि विशेषत: शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळण्यावर भर दिला जात आहे. मात्र या शिवसेनेच्या संपर्क अभियानाच्या बॅनरवरुन उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसैनिकांमध्येच जोरदार राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
परांडाचे शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा फोटो बॅनरवर न लावल्याच्या रागातून आमदार तानाजीराव सावंत आणि पाटील यांचे समर्थक आपआपसात भिडले. यामध्ये शिवसेनेचे परंडा तालुका प्रमुख अण्णा जाधव गंभीर जखमी झाले असून त्यांना बार्शी येथील रुग्णालयात दाखल केले आहे. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना मागील काही दिवसांपासून पक्षाचे कार्यक्रम, बॅनर यामध्ये दुर्लक्षित केले जात होते, अशी चर्चा आहे. त्यामुळे पाटील समर्थक या प्रकारामुळे नाराज होते.
हे वाचलं का?
दोन्ही आजी माजी आमदारांनी यावर मात्र अद्यापपर्यंत कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाहीये. मारहाण झालेले अण्णा जाधव यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर बार्शीमधील जगदाळे मामा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT