ही देशाच्या जनतेला अफूच्या धुंदीत ठेवायची प्रयोगशाळा – Kashmir Files वरुन सेनेची भाजपवर टीका

मुंबई तक

The Kashmir Files चित्रपटावरुन देशात सध्या राजकारण सुरु आहे. भाजपशासिक राज्य सरकारनी हा चित्रपट टॅक्स फ्री केल्यानंतर इतर राज्यांवरही भाजप नेते हा दबाव टाकत आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सिनेमाचं कौतुक केलं असून आपल्या सर्व खासदारांना हा चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला आहे. परंतू भाजपचा जुना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

The Kashmir Files चित्रपटावरुन देशात सध्या राजकारण सुरु आहे. भाजपशासिक राज्य सरकारनी हा चित्रपट टॅक्स फ्री केल्यानंतर इतर राज्यांवरही भाजप नेते हा दबाव टाकत आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सिनेमाचं कौतुक केलं असून आपल्या सर्व खासदारांना हा चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला आहे. परंतू भाजपचा जुना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने यावर जोरदार टीका केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरात, काश्मिर फाईल्स चित्रपटावरुन सुरु असलेल्या राजकारणाला, ही तर देशातील जनतेला गुंगीत आणि अफूच्या धुंदीत ठेवण्याची प्रयोगशाळा असल्याचं म्हटलंय.

“द कश्मीर फाईल्स दहशतवाद्यांचा कट असू शकतो, कारण…”; भाजपच्या मित्रपक्षाचा गंभीर आरोप

चार राज्यांतील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी लगेच गुजरातला गेले आणि तिकडे त्यांनी विजयोत्सव साजरा केला. कारण यापुढच्या निवडणुका गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये होणार आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीआधी भाजपने हिजाबचा मुद्दा लावून धरला. हिंदू-मुस्लीम समाजात दरी निर्माण केली. धर्म आणि जात याबाबत कमालीचा द्वेष निर्माण केला की लोकांना जगण्या-मरण्याच्या प्रश्नाचा विसर पडतो. आता पुढच्या निवडणुका जिंकण्यासाठी संघ परिवाराच्या प्रेरणेने द काश्मिर फाईल्स नावाचा सिनेमा पडद्यावर आणला आहे.