हिरेन मृत्यू प्रकरण : मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याची सवय सोडा !

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजत असलेल्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात शिवसेनेन आज ‘सामना’च्या अग्रलेखातून विरोधी पक्षावर ताशेरे ओढले आहेत. अनैसर्गिक मृत्यू हा आप्तेष्टांना हलवून जातो, मनात संशय निर्माण करतो व राजकारणी त्यात भर घालतात. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास सुरु असताना राज्यात विरोधीपक्ष तेच करत आहेत. मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याची सवय विरोधीपक्ष सोडेत तेवढं बरं…असं म्हणत शिवसेनेने विरोधकांवर निशाणा साधला आहे.

ADVERTISEMENT

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे राज्याच्या विधानसभेत चांगलेच पडसाद उमटले. याप्रकरणी मुंबई पोलिस दलाचे अधिकारी सचिन वाझे आणि हिरेन यांच्यातील संबंधांवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न निर्माण केले. याचसोबत वाझे आणि शिवसेना यांचं जुनं कनेक्शन बाहेर काढून भाजपने सभागृहात शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्नही केला. याचसोबत मनसेनेही सर्व महत्वाच्या केसेस सचिन वाझे यांच्याकडेच कश्या जातात असं म्हणत या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हायला हवी अशी मागणी केली होती. या सर्व घटनांना आज सामना अग्रलेखातून समाचार घेण्यात आला आहे.

मनसुख हिरेन यांच्या पोस्ट मार्टम रिपोर्टमधून नवी माहिती समोर

हे वाचलं का?

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या गाडीत जिलेटीनच्या कांड्या सापडतात…ज्यात जैश ए मोहम्मद टाईप धर्मांध संघटनेकडून अंबानी कुटुंबाला मारण्याबाबत धमकीपत्र असल्याचा दावा पोलिसांनी केला. इमारतीबाहेर जिलेटीनने भरलेली गाडी सोडून चालक निघून गेला, यानंतर सकाळी या गाडीचा संशय आला आणि मग धावपळ सुरु झाली. या सिनेमाची कथा-पटकथा प्रत्यक्षात पडद्यावर आली असली तर बिगबजेट सिनेमाही पहिल्याच शो ला कोसळला असता इतके कच्चे दुवे या रहस्यपटात असल्याचं सामनामध्ये म्हटलं आहे.

अंबानी कुटुंबाची स्वतःची सुरक्षाव्यवस्था ही सरकारपेक्षा मजबूत आहे. त्यांच्या घराबाहेर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत…कोणालाही तिकडे फिरकता येत नाही. अशातच एक स्फोटकांनी भरलेले वाहन तिकडे येते कसे. यानंतर याप्रकरणाचा तपास इंचभरही पुढे सरकला नाही. माझे वडील चांगले पोहणारे होते, ते आत्महत्या करणाऱ्यांपैकी नव्हते अशी माहिती त्यांच्या मुलाने दिली आहे. पण त्यांच्याकडील प्रत्येक माहिती खरी असेलच असं नाही…म्हणत अग्रलेखातून सरकारची बाजू ठामपणे मांडण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT