संन्यास घेतील तुमचे दुष्मन ! शिवसेनेच्या देवेंद्र फडणवीसांना कोपरखळ्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ओबीसी आरक्षणावरुन राज्यातील भाजप सरकारने चक्काजाम आंदोलन करत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल चढवला. भाजपच्या टीकेचा महाविकास आघाडीतल्या नेत्यांनीही चांगलाच समाचार घेतला. ओबीसी आरक्षणाचा विषय माझ्याकडे द्या, ४ महिन्यात आरक्षण मिळवून देतो…नाहीतर राजकीय संन्यास घेतो अशी घोषणा फडणवीसांनी नागपूरमधील आंदोलनात केली होती. शिवसेनेने सामना च्या अग्रलेखातून फडणवीस यांच्या या घोषणेचा चांगलाच समाचार घेतला आहे. संन्यास घेतील तुमचे दुष्मन असं म्हणत शिवसेनेने फडणवीसांना टोला लगावलाय.

ADVERTISEMENT

भाजप प्रत्येक विषयात ‘टांग’ टाकतंय –

फडणवीस इतके इरेला का पेटले आहेत? OBC समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. याला केंद्र सरकार जबाबदार आहे की राज्य सरकार या वादात आता कोणीही पडू नये. पण गेल्या काही दिवसांत भाजप प्रत्येक विषयात टांग टाकून राज्य सरकारला कोंडीत अडकवण्याचा प्रयत्न करतंय. नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा ठराव पास झाला, त्याला विरोध करत भाजप रस्त्यावर उतरलं. राम मंदिराच्या संदर्भात घोटाळ्यावर कोणी सत्यकथन केलं की त्यांना मिरच्या झोंबतात. एखाद्या विषयात आडवं जायचं म्हणजे जायचं हेच भाजपचं एकंदरीत धोरण दिसतंय.

हे वाचलं का?

फडणवीसांकडे जादूची कांडी असेल तर –

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपने घेतलेली भूमिका हास्यास्पद आहे. हा विषय केंद्राच्या कोर्टात गेल्यामुळे मुख्यमंत्री थेट दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींना भेटले. या प्रश्नी आवाज बुलंद करण्यासाठी आंदोलन करावे लागेल आणि ते ही दिल्लीतच पण दिल्लीचं नाव काढलं की यांना पुन्हा ठसका लागतो. ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन हेच दळभद्री राजकारण सुरु आहे. आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेलेला असताना, पुन्हा आमचं सरकार आणा आरक्षण देतो असं फडणवीस म्हणतात. त्यांच्याकडे काही जादूची कांडी असेल तर त्यांनी ती महाराष्ट्राच्या हितासाठी फिरवून समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे.

ADVERTISEMENT

यावेळी अग्रलेखात शिवसेनेने बावनकुळे, खडसे हे ओबीसी नेतृत्व मोडून काढणारे व त्यांचे पंख कापणारे कोण आहेत हे देखील महाराष्ट्राला कळू द्या असं म्हणत भाजपवर टीका केली आहे. आम्हाला मराठा आणि ओबीसी आरक्षणाची चिंता असून फडणवीसांच्या राजकीय संन्यास घेण्याच्या घोषणेचीही आहे. त्यांनी त्रागा करुन घेऊ नये, सर्वकाही सुरळीत त्यांच्या मनासारखे होईल. संन्यास घेतील त्यांचे दुष्मन असं म्हणज शिवसेनेने फडणवीसांना टोला लगावला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT