धक्कादायक… चुकीचे सोनोग्राफी निदान केल्याने गर्भवती महिलेसह बालकाचा मृत्यू, डॉक्टरविरोधात गुन्हा
कुंवरचंद मंडले, नांदेड: नांदेड जिल्ह्यातील एका गर्भवती महिलेची चुकीची सोनोग्राफी केल्याने गर्भवती महिलेसह तिच्या बाळाचा गर्भातच मृत्यू झाल्याची अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चौकशी समितीच्या अहवालानंतर धर्माबाद पोलिसांनी दोषी आढळलेल्या सोनोग्राफी सेंटरच्या डॉक्टरवर गुन्हा दाखल केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात असलेल्या बोळसा या गावातील 19 वर्षीय अनुसया गजानन […]
ADVERTISEMENT
कुंवरचंद मंडले, नांदेड: नांदेड जिल्ह्यातील एका गर्भवती महिलेची चुकीची सोनोग्राफी केल्याने गर्भवती महिलेसह तिच्या बाळाचा गर्भातच मृत्यू झाल्याची अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चौकशी समितीच्या अहवालानंतर धर्माबाद पोलिसांनी दोषी आढळलेल्या सोनोग्राफी सेंटरच्या डॉक्टरवर गुन्हा दाखल केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात असलेल्या बोळसा या गावातील 19 वर्षीय अनुसया गजानन चव्हाण ही सात महिन्यांची गरोदर असताना 7 जुलै 2021 रोजी तेलंगणातील भैसां येथील डॉ. हादिया बेगम यांच्या आराधना डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सोनोग्राफी करण्यासाठी गेली होती.
या ठिकाणी तिची सोनोग्राफी करण्यात आली. मात्र, यावेळी डॉ. हादिया बेगम यांनी चुकीचे निदान केले होते. काही दिवसांनी महिलेच्या अचानक पोटात दुखू लागलं त्यामुळे तिला तात्काळ उमरी येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण तेथून महिलेला नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आलं होतं. मात्र, काही तासातच गर्भवती महिलेसह तिच्या बाळाचा गर्भातच मृत्यू झाला.
हे वाचलं का?
दरम्यान, महिला आणि मुलाच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांनी आरोग्य विभागाकडे तक्रार केली होती. त्यामुळे याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली होती. या सगळ्यात चौकशी समितीने सखोल तपास केला तसेच सोनोग्राफी सेंटरच्या डॉक्टरचीही चौकशी केली. त्यानंतर तब्बल एक वर्षभरानंतर समितीच्या चौकशीअंती सदर डॉ. हादिया बेगम यांनी चुकीचे निदान (सोनोग्राफी) केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस आता याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
धक्कादायक! गर्भवती पत्नीला जिवंत जाळलं, अर्भकाचा मृत्यू
ADVERTISEMENT
पाहा पोलिसांनी काय दिली माहिती
ADVERTISEMENT
धर्माबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारी एक महिला जी सात महिन्यांची गरोदर होती तिला सातव्या महिन्यात त्रास झाल्यानंतर तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं होतं. नांदेड येथील सरकारी दवाखान्यात तिचा इलाज सुरु होता पण त्यादरम्यान ती मरण पावली. त्या संदर्भात पोलीस स्टेशन धर्माबाद येथील अधिकाऱ्यांना शंका वाटली त्यामुळे त्यांनी नांदेडच्या मेडिकल कॉलेजचे डीन यांना पत्र देऊन त्या महिलेवर जे इलाज झाले होते त्यासंदर्भात कुठे चूक झाली होती का? या संदर्भात चौकशी करण्याची विनंती केली होती.
त्यामध्ये एक समिती स्थापन झाली. त्या समितीने काही दिवसांपूर्वी पोलीस स्टेशन धर्माबाद येथे एक रिपोर्ट पाठवला. त्यामध्ये सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार झाला असा स्पष्ट अभिप्राय त्यांनी दिला आहे. त्यानुसार पोलीस स्टेशन धर्माबाद येथे कलम 304 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती धर्माबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT