धक्कादायक! बारामतीत केसरी टूर्सच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलेवर चाकू हल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या बुकिंग ऑफिस मध्ये काम करणाऱ्या एका महिलेवर चाकूहल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत त घडला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून आरोपी या शोधासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी पथके रवाना केली आहेत.

ADVERTISEMENT

यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा युवक सोमवारीदेखील टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या ऑफिस बाहेर रेंगाळताना दिसला होता. आज दुपारी त्याने ऑफिसमध्ये प्रवेश करीत सोमवारी देखील मी आलो होतो पण ऑफीस बंद होते असं म्हणत काम करत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या गळ्यात असलेल्या दागिन्यांकडे हात नेला या महिलेला प्रतिकार केला असता तिच्यावर चाकूहल्ला करत हा युवक पळून गेला. ऑफिसच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये या युवकाचे चित्रीकरण झाले असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. दरम्यान, या महिलेच्या करंगळीला दुखापत झाली आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. हा हल्ला कोणत्या कारणासाठी झाला याचा शोध मात्र अद्याप लागलेला नाही.

सकाळी साडेदहा वाजता शहरातील केसरीच्या रजत टूर्सचे ऑफिस उघडल्यानंतर काही वेळाने हा तरुण ऑफिसमध्ये आला. मी सोमवारी आपल्या ऑफिसला येऊन गेलो. परंतु आपण काल ऑफिस लवकर बंद केले असे म्हणत या आरोपीने महिलेच्या गळ्यात हात घातला. तेव्हा हा माणूस सोन्याची चेन चोरतोय की काय असं वाटून या महिलेने त्या आरोपीचा हात धरला. त्यामुळे भेदरलेल्या आरोपीने माझा हात सोड असे म्हणत कर्मचारी महिलेच्या हातावर चाकूचा वार केला आणि तो पळून गेला. काही जणांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतू तो आपली चप्पल न घालताच गाडीवर बसून पसार झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या माणसाचा चेहरा कैद झाला आहे. त्याच आधारे पोलीस आता याच आधारे पोलीस या तरूणाचा तपास करत आहेत.

हे वाचलं का?

चाकू हाताला लागल्यामुळं महिला जखमी झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्या आधारे आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना झाली आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT