सिद्धार्थ शुक्लाला आध्यात्माची होती फार गोडी, आईसोबत जायचा ‘इथे’!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: अभिनेता आणि बिग बॉस 13 सीझनचा विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली निधनाने अवघ्या सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अवघ्या वयाच्या 40 व्या वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला आहे. ज्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. खरं म्हणजे सिद्धार्थ हा खूपच वेगळ्या स्वभावाचा होता असं म्हटलं जातं. एवढंच नव्हे तर त्याला आध्यात्माची देखील गोडी होती.

ADVERTISEMENT

सिद्धार्थ हा आपली आई रिटा शुक्ला यांच्यासोबत ब्रह्मकुमारी संस्थानात देखील जात असे. या ठिकाणी गेली अनेक वर्ष तो जात असल्याचं तेथील लोक सांगतात.

सिद्धार्थ शुक्लाला अध्यात्माची आवड होती, तो आईसोबत ब्रह्मकुमारिस संस्थेत जायचा. सिद्धार्थ हा आपली आई रिटा यांच्यासोबत माऊंट अबू येथील ब्रह्मकुमारी संस्थानात जात असे. जिथे तो आध्मात्मविषयी बरंच काही जाणून घेण्याचा प्रयत्न करे. याशिवाय तो तिथे राजयोग ध्यान देखील करत असे.

हे वाचलं का?

सिद्धार्थ शुक्लाला होती अध्यात्माची विशेष आवड

सिद्धार्थ शुक्ला याला अध्यात्माची आवड असल्याने तो माउंट अबूला नेहमी जात असे. पण यासोबतच तो मुंबईतील ब्रह्माकुमारी संस्थेच्या सेवा केंद्रांनाही भेट देत असत. त्याला योगामध्ये अधिक रस होता. त्याला एकांतात राहणं फार आवडायचं.

ADVERTISEMENT

संस्थान प्रमुख राजयोगिनी दादी रतनमोहिनी यांनी सिद्धार्थच्या निधनानंतर आपल्या शोक संदेश म्हटलं आहे की, ‘दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली आहे. तसेच त्याच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करीत आहोत. सिद्धार्थ पहिल्यांदा तीन वर्षांपूर्वी ब्रह्माकुमारी संस्थेच्या शांतीवनात आले होते, तर दुसऱ्यांदा 2018 मध्ये तो एका कार्यक्रमासाठी इथे आला होता.’

ADVERTISEMENT

सिद्धार्थ शुक्ला हा अनेकदा आपल्या आईसोबतच ब्रम्हकुमारी संस्थेत येत असल्याचं येथील लोक सांगतात. खरं म्हणजे सिद्धार्थ हा लहानपणापासूनच ब्रह्मकुमारी संस्थेशी जोडला गेला होता. कारण त्याची आई गेली अनेक वर्ष ब्रह्माकुमारी संस्थेत जात होती. या संस्कारांमुळे सिद्धार्थला देखील आध्यात्माविषयी अधिक आवड असल्याचं बोललं जात आहे.

Rashmi Desai: सिद्धार्थ शुक्लाचं निधन आणि एक्स गर्लफ्रेंड रश्मी देसाईची पोस्ट

ब्रह्माकुमारींच्या प्रथेनुसारच सिद्धार्थाच्या पार्थिवावर करण्यात आले अंत्यसंस्कार

सिद्धार्थ शुक्लावर ब्रह्मकुमारी प्रथेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. जाणून घ्या ब्रह्मकुमारी तपस्वीनी बेन यांनी याबाबत नेमकी काय माहिती दिली.

ब्रह्मकुमारी तपस्विनी बेन ‘आज तक’शी बोलताना सिद्धार्थच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आणि त्यानंतर त्यांनी ब्रह्मकुमारी प्रथेनुसार अत्यंविधी कसे केले जातात याबाबत सविस्तर माहिती दिली. ‘आम्ही त्याच्या अमर, अविनाशी आत्म्यासाठी सर्व जण तेथे जाऊन ध्यान (मेडिटेशन) करू. त्यानंतर पार्थिव शरीराला टिळा लावण्यात येईल.’

‘हे झाल्यानंतर सिद्धार्थच्या पार्थिव देहाला फुलांचा हार घालण्यात येईल. तसंच त्यावेळी सगळे जण ‘ओम’चा जप करतील आणि नंतर त्याला श्रद्धांजली अर्पण केली जाईल. अशा पद्धतीने विधी पार पडेल. आम्हा सर्वांना सिद्धार्थच्या निधनामुळे प्रचंड दु:ख झालं आहे. तो आमचा लाडका भाऊ होता.’ असं त्यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT