हिंदमाता परिसरात पाणी साचलं त्याला स्मृती इराणी जबाबदार – शिवसेना खासदार राहुल शेवाळेंचा दावा
मान्सून मुंबईत दाखल झाल्यानंतर त्याने पहिल्याच प्रयत्नात शहरात दाणादाण उडवून दिली. गेल्या ३-४ दिवसांपासून शहरात जोरदार पाऊस सुरु आहे, ज्यामुळे दादर-परळ, हिंदमाता, सायन, माटुंगा यासारख्या भागांमध्ये पाणी साचतंय. यावरुन सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरु असताना शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी हिंदमाता परिसरात पाणी साचण्याला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जबाबदार असल्याचा आरोप केलाय. […]
ADVERTISEMENT
मान्सून मुंबईत दाखल झाल्यानंतर त्याने पहिल्याच प्रयत्नात शहरात दाणादाण उडवून दिली. गेल्या ३-४ दिवसांपासून शहरात जोरदार पाऊस सुरु आहे, ज्यामुळे दादर-परळ, हिंदमाता, सायन, माटुंगा यासारख्या भागांमध्ये पाणी साचतंय. यावरुन सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरु असताना शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी हिंदमाता परिसरात पाणी साचण्याला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जबाबदार असल्याचा आरोप केलाय.
ADVERTISEMENT
यंदा पावसाच पाणी साचू नये म्हणून महापालिकेने हिंदमाता परिसरात Underground टाक्या तयार करण्याचं काम केलं होतं. वडाळ्याजवळ प्रमोद महाजन उद्यानाजवळ पाईपलाईनद्वारे हे पाणी आणून समुद्रामध्ये सोडण्याचा आमचा प्रयत्न होता. ही पाईपलाईन NTC च्या भागातून जात असल्यामुळे आम्ही केंद्रीय मंत्री स्मृती इराणींकडे परवानगी मागितली होती. परंतू ही परवानगी न देता केंद्राने याविरोधात कोर्टात धाव घेतली…याच दिरंगाईमुळे आणि आडमुठ्या धोरणामुळे यंदा Underground टाक्यांचं काम वेळेत होऊ शकलं नाही आणि पाण्याचा निचरा व्हायला वेळ लागला. त्यामुळे यासाठी स्मृती इराणी जबाबदार आहेत, राहुल शेवाळे टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
Mumbai Rain : हिंदमाता परिसर पुन्हा जलमय
हे वाचलं का?
पाठपुरावा करुनही NTC ने वेळेत परवानगी दिली नाही आणि ज्यावेळी परवानगी दिली त्यावेळी महापालिकेकडे त्यांनी मोठ्या रकमेची मागणी केली. पावसाळ्याच्या आधी ही परवानगी मिळाली असती तर आम्ही काम वेळेत केलं असतं. परंतू आता पावसाळ्यात परवानगी मिळाल्यानंतर हे काम वेळेत होणं शक्य नाही. त्यामुळे मुंबईकरांना जो त्रास झाला त्यासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप शेवाळे यांनी केला. त्यामुळे शिवसेनेने केलेल्या आरोपावर भाजप आता काय उत्तर देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Monsoon in Mumbai : रविवार-सोमवार शहरात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अतिवृष्टीचा अंदाज
ADVERTISEMENT
दरम्यान, आज झालेल्या पावसामुळेही हिंदमाता परिसरात पावसाचं पाणी साचलं. पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. दरम्यान पुढचे दोन दिवसही मुंबईत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे महापालिका यंत्रणांना अधिक सजग रहावं लागणार आहे.
ADVERTISEMENT
Monsoon in Mumbai : ११ दिवसांत शहरात रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद, मुंबईसह कोकण किनारपट्टीला IMD चा अलर्ट
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT