पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांवर काळाची झडप; ट्रक-ट्रॅक्टर अपघातात ५ भाविक ठार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विजयकुमार बाबर, सोलापूर

ADVERTISEMENT

एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेल्या भाविकांवर रविवारी रात्री काळाने झडप घातली. ट्रक्टरमधून पंढरपूरकडे जात असताना सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कोंडीजवळ भरधाव ट्रकने पाठीमागून भाविकांच्या ट्रॅक्टरला धडक दिली. या भीषण अपघातात ५ भाविक ठार झाले आहेत. ३० भाविक जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तुळजापूरहून पंढपूरकडे निघालेल्या भाविकांच्या ट्रक्टर ट्रालीला पाठीमागून ट्रकने जोराची धडक दिली. सोलापूर-पुणे महामार्गावर सोलापूरजवळील कोंडी येथे रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात जखमींची संख्या मोठी असून, मृतांची आकडा वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.

हे वाचलं का?

अपघातात मरण पावलेले व जखमी झालेले सर्वजण वारकरी सांप्रदायातील असून, तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील राहणारे आहेत. एकादशीनिमित्त हे सर्वजण माऊलीच्या दर्शनासाठी रात्री ट्रक्टर ट्रालीतून पंढरपूरला निघाले होते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

सोलापूर-पुणे महामार्गावर शहराजवळच असलेल्या कोंडी गावाच्या परिसरात ट्रक्टरला पाठीमागून एका ट्रकने (एमएच १२ टीव्ही ७३४८) जोराची धडक दिली.

जुन्नर: एकाच गावातील तीन मुलांचा बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

भरधाव असलेल्या ट्रकचे टायर फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक भाविकांच्या ट्रक्टर ट्रालीवर जाऊन जोरात आदळला, अशी माहिती समोर आली आहे.

या अपघातात पाच भाविक जागीच गतप्राण झाले. तर ३० जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना शासकीय रूग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी शासकीय रूग्णालयात धाव घेतली. त्याचबरोबर घटनास्थळी जाऊन त्यांनी अपघातात झालेल्या ठिकाणाची पाहणी केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT