मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या ‘त्या’ विधानाबद्दल दत्ता भरणेंची दिलगीरी व्यक्त, Shivsena नेत्यांची आक्रमक भूमिका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोलापुरातील एका कार्यक्रमात पालकमंत्री दत्ता भरणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलेल्या एका विधानामुळे शिवसेना नेते चांगलेच संतापले. जाहीर कार्यक्रमात बोलत असताना दत्ता भरणेंनी…‘मुख्यमंत्री जाऊ द्या, मरु द्या’ असं वक्तव्य केलं. या विधानाबद्दल भरणेंनी माफी मागावी नाहीतर पालकमंत्र्यांची जीभ काढून हातात देऊ अशा इशारा स्थानिक शिवसेना नेत्यांनी दिला.

ADVERTISEMENT

ज्यानंतर दत्ता भरणेंनीही आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त करत आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचं स्पष्टीकरण दिलंय. “मुख्यमंत्री आमचे नेते आहेत. त्यांच्यावर माझे प्रेम आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे खूप चांगलं काम आहे. काही माध्यमांनी मुद्दाम माझ्या बोलण्याचा विपर्यास केला. माझ्या भाषणाचा चुकीचा अर्थ लावून विपर्यास केला गेला. त्याबद्दल कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.” भरणेंच्या या स्पष्टीकरणानंतर हा वाद आता मिटण्याची चिन्ह आहेत.

मुख्यमंत्र्यांचं जाऊ द्या…मरु द्या, माझे नेते Ajit Pawar ! सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणेंचं वादग्रस्त वक्तव्य

हे वाचलं का?

नेमकं काय म्हणाले होते दत्ता भरणे ज्यामुळे हा वाद सुरु झाला?

सोलापुरात आज माजी वसुंधरा अभियान मोहीमेअंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलत असताना भरणेंनी हे आक्षेपार्ह विधान केलं. “गटनेत्यांनी, नगसेवकांनी, आयुक्तांनी मला परवानगी दिली आहे. इथं चांगलं गार्डन आपल्याला करायचं आहे. त्यासाठी आपल्याला एक कोटी रुपये निधी द्यायचा आहे. तुमचा प्रस्ताव कधी येईल मला? असं बोलत असताना महापौरांनी मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं असता ते मुख्यमंत्र्यांचं जाऊ द्या, मरु द्या, आपलं आपण करु. मुख्यमंत्र्यांकडून आपण मोठा निधी घेऊ. आपण आपल्या पातळीवरुन सुरुवात करु. कलेक्टर आहेत, तुम्ही आहेत, आयुक्त आहेत. आपण सुरुवात करुया.” ज्यानंतर वादाला सुरुवात झाली.

ADVERTISEMENT

शिवसेना नेत्यांचा दत्ता भरणेंना सज्जड दम –

ADVERTISEMENT

सोलापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी दत्तात्रय भरणे यांना सज्जड दम दिलाय. “भरणे मामा तुम्ही औकातीत राहा. आम्ही बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. उद्धव ठाकरे यांच्या जिवावर तुम्ही सत्तेत आहात. तुम्हाला जनतेनं फेकुन दिलं होतं. भरणे यांची हिम्मत असेल तर त्यांनी उजनीची सीमा ओलांडून दाखवावी. शिवबंधनाची ताकद पहायची आहे का. महाविकास आघाडी आहे आणि आमच्यावर बंधन आहे म्हणून आम्ही शांत आहोत. आमच्यावर काही बोलून छातीवर ठोकायची वेळ येऊ देऊ नका. भरणे यांना योग्य वेळी शिवसैनिकांच्या माध्यमातून उत्तर देऊ”, असा इशाराच तानाजी सावंत यांनी दिला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT