सोलापूर : माजी नगरसेवकाच्या बंगल्यावर हल्ला; दगड-बिअरच्या बाटल्या भिरकावल्या, हवेत गोळीबार
सोलापूरमध्ये बार्शी-आगळगाव रस्त्यावर वाणी प्लॉट परिसरात राहणाऱ्या माजी नगरसेवक विनोद संजय वाणी यांच्या बंगल्यावर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली. बंगल्याच्या गेटवर चढून आवारात दगड आणि बियर बाटल्याच्या काचा फेकून अज्ञात व्यक्तींनी गावठी पिस्तुलातून हवेत दोन वेळा फायरिंग केली. शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडलेल्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्री वाणी कुटुंबीय जेवण आटोपून […]
ADVERTISEMENT
सोलापूरमध्ये बार्शी-आगळगाव रस्त्यावर वाणी प्लॉट परिसरात राहणाऱ्या माजी नगरसेवक विनोद संजय वाणी यांच्या बंगल्यावर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली. बंगल्याच्या गेटवर चढून आवारात दगड आणि बियर बाटल्याच्या काचा फेकून अज्ञात व्यक्तींनी गावठी पिस्तुलातून हवेत दोन वेळा फायरिंग केली. शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडलेल्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
गुरुवारी रात्री वाणी कुटुंबीय जेवण आटोपून झोपी गेले. कुटुंबातील काही सदस्य वरच्या मजल्यावर झोपी गेले होते. माजी नगरसेवकाचे बंधू विशाल संजय वाणी हे खालच्या खोलीत दार बंद करून टीव्ही पाहत होते. इतक्यात बंगल्याचे आवारात काचा व दगड फेकल्याचा त्यांना आवाज आला. ते दार उघडत असताना हवेत गोळीबार झाल्याचा आवाज झाला.
त्यांनी एक दार उघडून बघितले असता गेटवर चढलेले आरोपी दिसले. ते घरात शिरतील म्हणून त्यांनी तत्काळ दार बंद करून फोनवरुन पोलिसांशी संपर्क केला. पंधरा मिनिटांत सहाय्यक पोलीस निरीक्षक कर्नेवाढ आणि त्यांचे पथक दाखल होताच आरोपींनी तेथून पळ काढला.
हे वाचलं का?
शुक्रवारी सकाळी पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, याबाबत बार्शी शहर पोलिसांत विशाल वाणी यांनी तक्रार दिली आणि रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पहाटे पाचच्या सुमारास या घटनेचा पंचनामा करण्यात आला. दरम्यान न उडालेले तेथे पडलेलं एक जिवंत काडतूस आणि हवेत फायरिंग केल्यानंतर आवारात पडलेली पुंगळी पोलिसांनी जप्त केली. पोलिसांच्या चौकशीत आरोपी हे दोन दुचाकीवरून आले होते, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी या घटनेचा तपास करीत काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT