सोमय्यांच्या प्रयत्नांना यश : किशोरी पेडणेकरांवर मोठी कारवाई; एसआरएचे बीएमसीला आदेश

मुंबई तक

मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एसआरएच्या सदनिका पेडणेकर यांनी बळकवल्याचा आरोप भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला होता. त्यांनी याबाबतची तक्रारही एसआरएमध्ये केली होती. याच प्रकरणामध्ये पेडणेकर यांना एसआरएने मोठा धक्का दिला आहे. पेडणेकर यांच्याकडील ४ सदनिका ताब्यात घेण्याचे आदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एसआरएच्या सदनिका पेडणेकर यांनी बळकवल्याचा आरोप भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला होता. त्यांनी याबाबतची तक्रारही एसआरएमध्ये केली होती. याच प्रकरणामध्ये पेडणेकर यांना एसआरएने मोठा धक्का दिला आहे.

पेडणेकर यांच्याकडील ४ सदनिका ताब्यात घेण्याचे आदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अर्थात एसआरएने मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत. तहसिलदार उमेश पाटील यांनी हे आदेश काढले आहेत. एसआरएने या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सामान्य नागरिकांच्या सदनिका किशोरी पेडणेकर यांनी हस्तांतरीत केल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता असा आरोप देखील सोमय्या यांनी केला होता.

सोमय्या यांनी काय आरोप केले होते?

किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन किशोरी पेडणेकरांविरुद्ध गंभीर आरोप केले होते. ते म्हणाले होते, “किशोरी पेडणेकर यांनी गरीब झोपडपट्टीवासीयांचे एसआरएचे गाळे हडप केले. इतकंच नाही, तर बोगस बनावट कागदपत्रांच्या आधारे गोमाता जनता एसआरएचे गाळे स्वतःच्या किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि. कंपनीच्या नावे करण्याचा गुन्हा केला आहे”.

पेडणेकर यांनी गोमाता जनता एसआरएमधील चार सदनिका अनधिकृतरित्या बळकावल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही तक्रार दाखल केली होती. तसंच या सदनिका महानगरपालिकेने ताब्यात घ्याव्यात अशी मागणी त्यांनी केली होती. सोमय्याांच्या तक्रारीची दखल घेत आता एसआरएने या सदनिका ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp