SSC Result 2021: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट, ‘या’ विद्यार्थ्यांना ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण मिळणार!
मुंबई: कोरोना (Corona) संकटामुळे यंदा राज्य सरकारने दहावीची परीक्षाच (SSC Exam) न घेण्याचा निर्णय घेतला. अशावेळी विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने गुण दिले जाणार असून त्याद्वारे निकाल (SSC Result) जाहीर केला जाणार आहे. आता याच निकालाबाबत आणखी एक मोठी घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केली आहे. 2020-21 या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी […]
ADVERTISEMENT
मुंबई: कोरोना (Corona) संकटामुळे यंदा राज्य सरकारने दहावीची परीक्षाच (SSC Exam) न घेण्याचा निर्णय घेतला. अशावेळी विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने गुण दिले जाणार असून त्याद्वारे निकाल (SSC Result) जाहीर केला जाणार आहे. आता याच निकालाबाबत आणखी एक मोठी घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
2020-21 या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी शासकीय रेखा कला परीक्षा (Elementary and Intermediate Drawing Exam) देऊन त्यामध्ये उत्तीर्ण झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना आता दहावीच्या निकालात याचे अतिरिक्त गुण दिले जाणार आहेत. ज्याचा दहावीतील विद्यार्थ्यांना बराच फायदा होणार आहे. याबाबतचा जीआर देखील शिक्षण विभागाने काढला असून मंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर तो शेअर केला आहे.
महत्त्वाची सूचना :
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये जे दहावीचे विद्यार्थी यापूर्वी शासकीय रेखा कला परीक्षेत(एलिमेंटरी व इंटरमिजीएट ड्रॉईंग ग्रेड)उत्तीर्ण झाले आहेत, ते विद्यार्थी मंडळाच्या प्रचलित धोरणांनुसार अतिरिक्त गुणांसाठी पात्र आहेत. अधिक माहितीसाठी पुढील GR पहा.#sscexams #SSC pic.twitter.com/Ch6Nvxpjye— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) June 16, 2021
SSC Result 2021: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाची पद्धत जाहीर
हे वाचलं का?
पाहा शिक्षण मंडळाने जारी केलेल्या पत्रकात नेमकं काय म्हटलं आहे:
राज्यातील कोव्हिड-19 या संसर्गजन्य साथ रोगाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासकीय रेखाकला (एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा 2020 चे आयोजन करण्यात येऊ नये, असा प्रस्ताव कला संचालनालयाच्या वर नमूद क्रमांक (4) येथील पत्रान्वये शासनास सादर करण्यात आला होता.
ADVERTISEMENT
त्यानुसार राज्यातील कोव्हिड-19 या संसर्गजन्य साथ रोगाच्या प्रादूर्भावामुळे, तसेच, विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षिततेची बाब विचारात घेऊन शासकीय रेखाकला परीक्षा 2020 चे आयोजन न करण्याबाबतचा शासन निर्णय वर नमूद क्रमांक 6 नुसार दिनांक 26 मार्च, 2021 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
Mahrashtra SSC exam Result 2021: मोठी घोषणा… दहावीचा निकाल जून २०२१ अखेर जाहीर करणार!
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वर नमूद दिनांक 12 मे, 2021 च्या शासन निर्णयान्वये सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
तसेच, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वर नमूद दिनांक 28 मे, 2021 च्या शासन निर्णयान्वये शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. 10 वी) साठी मूल्यमापन करताना शासनाच्या व मंडळाच्या धोरणानुसार व तरतुदीनुसार देय असलेल्या अन्य गुणंचा लाभ प्रचलित पद्धतीनुसार देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
कोरोनामुळे इंटरमिजिएट ड्राईंक ग्रेड परीक्षा आयोजित करणं शक्य नसल्यानं 2020-2021 यै शैक्षणिक वर्षासाठी एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस मिळालेल्या श्रेणीच्या आधारे सन 2020-21 मध्ये इ.10 वी परीक्षेत अतिरिक्त गुणांची सवलत देण्यात येईल.
-
राज्यातील कोव्हिड-19 या जागतिक महामारीच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता विचारात घेऊन शासकीय रेखाकला परीक्षा, 2020 चे आयोजन करण्यात येऊ नये.
-
यापूर्वी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दि. 24 नोव्हेंबर 2017 चा शासन निर्णय आणि दि. 20 डिसेंबर 2017 चे शासन शुद्धीपत्र यामधील तरतुदीनुसार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( इ. 10 वी) परीक्षेमध्ये अतिरिक्त गुणांची सवलत देता येईल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT