रंगोत्सवही नियमांच्या बंधनात राहूनच ! होळी, धुलिवंदनासाठी राज्य सरकारची नवीन नियमावली जाहीर
दोन वर्षांपासून संपूर्ण विश्व कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढत आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून भारतात प्रत्येक सण हा नियम आणि बंधनांमध्ये राहून साजरा करावा लागत आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरीही काही तासांवर येऊ घातलेल्या होळी आणि धुलिवंदनाचा सणही यंदा नियमांच्या चौकटीत राहून साजरा करावा लागणार आहे. राज्य सरकारने या सणासाठीची नवीन नियमावली जाहीर […]
ADVERTISEMENT

दोन वर्षांपासून संपूर्ण विश्व कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढत आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून भारतात प्रत्येक सण हा नियम आणि बंधनांमध्ये राहून साजरा करावा लागत आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरीही काही तासांवर येऊ घातलेल्या होळी आणि धुलिवंदनाचा सणही यंदा नियमांच्या चौकटीत राहून साजरा करावा लागणार आहे. राज्य सरकारने या सणासाठीची नवीन नियमावली जाहीर केली आहे.
रंग खेळताना गर्दी होऊन त्या माध्यमातून पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी ही नियमावली राज्य सरकारने जाहीर केल्याचं कळतंय.
राज्य सरकारच्या गृहविभागाने ही नियमावली जाहीर केली असून यात रात्री १० वाजल्याच्या आत होळी पेटवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसेच होळीदरम्यान डीजे लावण्यावरही मनाई करण्यात आली आहे.
लठमार होली, राधा-कृष्णाच्या प्रेमाची महती जपणारा रंगोत्सव










