राज्यावर पुन्हा लोडशेडिंगचं संकट?; उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले संकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लोडशेडींग मुक्त महाराष्ट्राचं स्वप्न राज्याच्या राजकारणात अनेकदा दाखवलं जातं. परंतू सध्या राज्यावर पुन्हा एकदा लोडशेडींगचं संकट घोंगावत आहे. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनीच याबद्दलचे संकेत दिले आहेत. ते अकोल्यातील एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होते.

ADVERTISEMENT

अकोला जिल्ह्यातील दोन विद्युत प्रकल्पांचं उद्घाटन नितीन राऊत यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलत असताना नितीन राऊत यांनी ग्राहकांना वीजबील वेळेत भरण्याची विनंती केली. वीजबील न भरलेल्या लोकांचं वीज कनेक्शन तोडण्यात येत यात काही नवीन नसल्याचंही राऊत म्हणाले. कारण ही शेवटी एक कंपनी आहे.

शेतकऱ्यांच्या वीजेसाठी राजु शेट्टींचं आंदोलन, सांगलीत महावितरणचं कार्यालय पेटवलं

हे वाचलं का?

राज्यात कोळशाची टंचाई असल्यामुळे जादा दराने कोळसा विकत घ्यावा लागतो आहे. यासाठी लागणारा पैसा जर वेळेत उपलब्ध झाला नाही तर राज्यात पुन्हा लोडशेडींग होऊ शकतं असंही नितीन राऊत म्हणाले.

..तर तुमच्या घरासमोर स्वतःचे हात कलम करेन- भ्रष्टाचाराच्या आरोपांवर बच्चू कडूंचं प्रत्युत्तर

ADVERTISEMENT

राज्यात वीजेचा प्रश्न सध्या गंभीर झाला आहे. कोरोना काळात आम्ही वीज तुटवडा होणार नाही याची काळजी घेतली, २४ तास वीजपुरवठा केला. मध्यंतरी राज्यात चक्रीवादळ, महापूर आले तिकडेही आम्ही वीजपुरवठा पूर्ववत केला. देशात आणि विदेशात कोळशाची टंचाई आहे. त्यामुळे बाहेरुन मोठ्या दराने वीज खरेदी करुन आम्ही वीज दिली आहे. ग्राहकांनी वीजबील वेळेत भरलं तर नक्कीच या प्रश्नावर तोडगा काढता येऊ शकतो असं नितीन राऊत म्हणाले.

ADVERTISEMENT

यावेळी बोलत असताना नितीन राऊत यांनी वीज कोणालाही फुकट मिळणार नसल्याचं सांगितलं. जे वीजबील भरणार नाहीत त्यांचं कनेक्शन कापलं जाईल. कारण या कंपन्या आहेत, वीज निर्माण करायला कोळसा, पाणी लागतं…कर्मचाऱ्यांचे पगार असतात, बँकाची कर्ज घेतलेली असतात त्याचं व्याज भरायचं असतं. यासाठी पैसा कुठून आणायचा? असा सवाल नितीन राऊतांनी यावेळी विचारला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT