Stomach Pain : पोटात गॅस झाल्यामुळे पोटदुखीने हैराण? ‘ही’ असू शकतात मुख्य कारणे..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Stomach Pain Cause of Gas Problem : अनेकांना पोटात गॅस होण्याची समस्या असते. पोटात गॅस होणे म्हणजे चुकीचा आहार, बदललेली जीवनशैली आणि व्यामाचा अभाव ही कारणे जबाबदार असतात. ही समस्या एक सामन्य गोष्ट आहे जी कोणालाही-कधीही होऊ शकते. पण काहीवेळेस पोटात गॅस तयार झाल्याने काहींना भयंकर पोटदुखीचा सामना करावा लागतो. हा एक गंभीर आजार असू शकतो ज्याला गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजार असे ही म्हणता येते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्हाला पोटासंबंधित असलेल्या आजारांचं निदान होत असेल तर त्यावर उपचार करता येतात. जर तुम्हाला वारंवार गॅसच्य समस्या होत असतील तर अशी काही लक्षणे आहेत ज्यामुळे आपल्याला हा त्रास होतो. याबाबत जाणून आपल्याला या समस्येवर उपाय किंवा उपचार घेता येतील.

ADVERTISEMENT

आतड्यांसंबंधीत असलेल्या समस्या

आतड्यांसंबंधी असलेल्या समस्या या लहान किंवा मोठ्या आतड्यांमध्ये दिसून येतात. आतड्यांसंबंधी समस्यांची अनेक कारणे आहेत, ज्यामध्ये क्रोहन आजार किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस जसं की आतड्यांमध्ये सूज येणे, शारीरिक अडथळे, स्नायू दुखणे इत्यादी समस्यांचा समावेश आहे. तसेच पचनसंस्थेद्वारे कर्करोग आणि इतर समस्या देखील उद्भवू शकतात.

Girl Murder : परीक्षा देऊन निघाली होती घरी, भरबाजारात दोन तरुणांनी…

गॅसमुळे पोटदुखीची ही समस्या कोणला होऊ शकते?

प्रत्येकाला कधी ना कधी आतड्यासंबंधित असलेले आजार होतातच होतात. काही लोकांना अन्नातून विषबाधा देखील होते. जे अनेकदा विषाणूजन्य आणि बुरशीजन्य अन्नामुळे होते. काही लोकांना क्रोहन आजार, अल्सरेटिव्ह कोलायटिस, सेलियाक आजार किंवा कोलन कर्करोग यांसारखे आतड्यांसंबंधी आजार देखील असू शकतात. पोटाच्या शस्त्रक्रियेमुळेही आतड्यांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. याशिवाय तुम्ही ओपियेट्ससारख्या औषधांचे दीर्घकाळ सेवन करत असाल तर आतड्यांमध्ये अर्धांगवायूसारख्या समस्याही उद्भवू शकतात. तसेच, मधुमेहासारख्या आजाराचा परिणामही आतड्यांवर होतो.

हे वाचलं का?

आतड्यांसंबंधित ‘या’ समस्यांचे कसे कराल निवारण?

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सुनिश्चित केले पाहिजे की, आपण दैनंदिन जीवनात दररोज 25 ते 30 ग्रॅम फायबरचे सेवन केले असावे. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहील. तसेच आतडेही चांगले राहतील. यासोबतच ब्लडप्रेशर आणि कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहते. जर तसे नसेल तर, किमान अँटीबायोटिक्सचे सेवन करा ज्यामुळे आतड्या गंभीर संसर्गापासून निरोगी राहतील. जर कुटुंबातील कोणाला कोलन कॅन्सर झाला असेल, तर वयाच्या ४५ किंवा त्यापूर्वी कोलन कॅन्सरची तपासणी करा.

अ‍ॅपल स्टोअरमध्ये फिल्मी स्टाईल चोरी; तब्बल चार कोटींच्या आयफोनवर हात साफ

आतड्यांना सूज येणे

आतड्यांना सूज येणे हे या आजारांसंबंधीत असलेले सर्वात सामान्य लक्षण आहे. आतड्यांचे दोन प्रकार आहेत. लहान आतडे 22 फूट आणि मोठे आतडे 5 फूटांचे असते. या पचन नलिका गॅस आणि मलाने भरलेल्या असतात, ज्यामुळे पोटात सूज येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अनेक भिन्न घटक आहेत, ज्यामध्ये आतड्यांसंबंधी रोग तसेच आहाराच्या सवयींचा समावेश आहे.

ADVERTISEMENT

सुनिल केदार यांचा बावनकुळेंना धोबीपछाड; नागपूरमध्येच दिला मोठा धक्का

उलटी किंवा डायरिया होणे

जेव्हा आतड्यांमध्ये ब्लॉकेज येतात तेव्हा अन्न किंवा पाणी न पचने लक्षणं दिसतात. तेव्हा उलट्यांचा त्रासही होऊ शकतो. ज्यावेळी आतडे निरोगी असतात त्यावेळी अन्न आणि पाण्याचे योग्यरित्या पचन होते. ज्यामुळे द्रव देखील शोषला जातो. त्यानंतर, शरीरातून मल सहज बाहेर पडतो. पण आतड्यांमध्ये काही समस्या असल्यास, डायरियाचा त्रास उद्भवतो.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT