MPSC कडून 'या' पदासाठी निघाली मोठी भरती; लाखोंमध्ये पगार...आताच करा अर्ज
MPSC Post: महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) कडून सहाय्यक आयुक्त म्हणजेच असिस्टंट कमिश्नरची भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? जाणून घ्या, संपूर्ण माहिती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

MPSC कडून 'या' पदासाठी भरती

अर्जाची शेवटची तारीख काय?

जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
Assistant Commissioner Recruitment 2025: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या तरुणांसाठी मोठ्या भरतीची जाहिरात समोर आली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) कडून सहाय्यक आयुक्त म्हणजेच असिस्टंट कमिश्नरची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी MPSC ने त्यांच्या mpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर 20 मे पासून अर्जाची प्रक्रिया सुरू केली आहे. उमेदवार 9 जून 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
पदाची माहिती
ही भरती अॅनिमल हसबेंडरी म्हणजेच पशुसंवर्धन 'ग्रुप A' च्या पदांसाठी घेण्यात येणार आहे.
पात्रता
या नवीनतम भरती फॉर्ममध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे बॅचलर ऑफ वेटनरी सायन्स (पशुवैद्यकीय विज्ञान पदवी) असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवारांची वयोमर्यादा किमान 19 वर्षे आणि कमाल 38 वर्षे असावी. तसेच, एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट मिळेल आणि ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची सूट मिळेल. उमेदवार भरतीची अधिकृत जाहीरात पाहून पात्रतेशी संबंधित इतर माहिती देखील तपशीलवार तपासू शकतात.
सहाय्यक आयुक्त पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 60,000 ते 1,90,800 रुपये पगार मिळेल. उमेदवारांची निवड पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत प्रक्रियेच्या आधारे केली जाईल.
हे ही वाचा: Indian Air Force मध्ये मोठी भरती, 10वी-12वी पास तरूणांसाठी, संधी.. अर्जाची शेवटची तारीख कोणती?
कसा कराल अर्ज?
1. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या भरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी, उमेदवारांना प्रथम MPSC च्या अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in ला भेट द्यावी लागेल.
2. आता संबंधित भरतीच्या ऑनलाइन अर्ज लिंकवर जा.
3. तुमच्या बेसिक माहितीचा वापर करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
4. त्यानंतर लॉगिन करा आणि अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली उर्वरित माहिती भरा.
5. योग्य साइझमध्ये फोटो, स्वाक्षरी अपलोड करा आणि अर्ज शुल्क भरा. आता फॉर्मची अंतिम प्रिंटआउट घ्या आणि ती तुमच्याकडे सुरक्षित ठेवा.
हे ही वाचा: मुंबई पोलिसांकडून महिला IPS अधिकाऱ्याच्या पतीलाच अटक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
या भरतीशी संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी, उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.