मुंबई पोलिसांकडून महिला IPS अधिकाऱ्याच्या पतीलाच अटक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?

मुंबई तक

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एका आयपीएस अधिकाऱ्याच्या पतीला यांना अटक केली आहे. पुरुषोत्तम चव्हाण असे त्यांचे नाव असून त्यांनी आणि त्यांच्या नऊ साथीदारांनी मिळून 19 जणांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

मुंबई पोलिसांकडून महिला IPS अधिकाऱ्याच्या पतीलाच अटक
मुंबई पोलिसांकडून महिला IPS अधिकाऱ्याच्या पतीलाच अटक
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिला IPS अधिकाऱ्याच्या पतीलाच अटक

point

मुंबईत स्वस्त घरं देण्याच्या नावाखाली कोटींची फसवणूक

point

स्वस्त दरात फ्लॅटचे आमिष दाखवून फसवणूक

Mumbai News: महाराष्ट्रातील मुंबईतून मोठी आणि खळबळजनक बातमी आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एका आयपीएस अधिकाऱ्याच्या पतीला यांना अटक केली आहे. पुरुषोत्तम चव्हाण असे त्यांचे नाव असून त्यांनी आणि त्यांच्या नऊ साथीदारांनी मिळून 19 जणांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी लोकांना स्वस्त दरात फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. असंच आमिष देऊन त्यांनी जवळपास 24.78 कोटी रुपयांची फसवणूक केली.

मुंबई EOW ने पुरुषोत्तम चव्हाण याला आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतलं. या प्रकरणातील आरोपी पुरुषोत्तम चव्हाण आधीच तुरुंगात होते. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) दुसऱ्या एका प्रकरणात त्याची चौकशी करत होते.

बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने फसवणूक

पुरुषोत्तम चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे देखील तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी मिळून फ्लॅटचे खोटी नोंदणी कागदपत्रे बनवली. ही कागदपत्रे लोकांना खरी असल्याचे दाखवण्यात आले. लोकांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा म्हणून त्याने बनावट म्हणजेच खोटे फोटोज दाखवण्यात आले.

TDS घोटाळ्याचाही आरोप

263 कोटी रुपयांच्या टॅक्स डिडक्टेड एट सोर्स (टीडीएस) घोटाळ्याप्रकरणी ईडीने पुरुषोत्तम चव्हाण यांना अटक केली होती. ईडीने शोध घेतल्यानंतर त्यांना बनावट मालमत्ता विक्रीची कागदपत्रे आढळली. ईडीने तात्काळ EOW म्हणजेच  आर्थिक गुन्हे शाखेला याची माहिती दिली. आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) तपास सुरू असता असे आढळून आले की चव्हाण आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अनेक पीडितांना फसवण्यासाठी सरकारी कोटामधील बनावट मालमत्ता कागदपत्रे तयार केली होती.

तयार केली होती गँग

आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) अधिकाऱ्यांनी सांगितले की, चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक गँग तयार केली होती. ही टोळी लोकांना स्वस्त फ्लॅट्सचे आमिष दाखवून त्यांना अडकवत होती. यामध्ये लोकांकडून ते पैसे उकळत होते. या प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस आता सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

हे ही वाचा: Indian Air Force मध्ये मोठी भरती, 10वी-12वी पास तरूणांसाठी, संधी.. अर्जाची शेवटची तारीख कोणती?

पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी फ्लॅट खरेदी करण्याऱ्या लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी अनेक युक्त्या वापरल्या. त्यांनी बनावट कागदपत्रे तयार केली आणि ती खरी म्हणून सादर केली. त्यांनी लोकांना फ्लॅट दाखवण्यासाठी खोट्या साइटवरील भेटी देखील दिल्या. यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसत गेला. 

लोकांना असं फसवलं

फसवलेल्या गेलेल्या एका पिडीतेने सांगितले की चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे फ्लॅट सरकारी कोट्यातील असल्याचं त्यांना सांगितलं होतं आणि त्यामुळे ते स्वस्त दरात उपलब्ध असल्याचं आमिश दाखवलं. पीडितेने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना पैसे दिले. नंतर हे सर्व खोटे असल्याचे उघड झाले. 

यावरुन, पोलिसांनी लोकांना कोणत्याही प्रकारच्या फसवणूकींना बळी पडू नये असे आवाहन केले आहे. कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी, त्याची कागदपत्रे नीट तपासा. जर कोणी तुम्हाला स्वस्त दरात फ्लॅट देण्याचे आश्वासन देत असेल तर सावधगिरी बाळगा.

हे ही वाचा: वैष्णवी आई होणार म्हटली, तेव्हा शशांक हगवणेने चरित्र्यावर संशय... 2023 मध्ये काय घडलं होतं?

या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत अनेकांची चौकशी केली आहे. या प्रकरणात लवकरच आणखी अटक होण्याची पोलिसांना आशा आहे. या घोटाळ्याच्या मुळाशी जाऊन सर्व आरोपींना पकडणार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पुरुषोत्तम चव्हाण यांच्याविरुद्ध फसवणुकीच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांची चौकशी करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी मुंबई न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ज्यामध्ये एका प्रकरणात त्यांची कोठडीत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका मान्य केली आणि त्याला EOW कोठडीत पाठवण्यात आले.

हे वाचलं का?

    follow whatsapp